गणेश गाव प्रतिनिधी
नुरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील लवंग २५/४ येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांनी पालकांच्या मदतीने घरीच गणपतीची मूर्ती तयार करून.त्या गणपतीच्या मूर्ती आज शाळेत आणल्या .
मुलांना पुस्तकी ज्ञानबरोबरच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा व लहान वयातच त्यांच्यात कलेची आवड निर्माण व्हावी नवनिर्मितीची प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे संचालिका सौ.नूरजहाॅं शेख यांनी सांगितले
मुलांनी आपल्या बुद्धी चतुर्याने डेकोरेशन केले . फुले मनी,गवत,चमकी ,राख्या,पाने लावून सुरेख गणपतीच्या मूर्ती पर्यावरण पूरक तयार केल्या होत्या.शाळेमध्ये गणपतीच्या मूर्ती आणल्या नंतर सर्व विद्यार्थी एकमेकांचे बाप्पा अगदी निरखून पाहत होते.नवनिर्मितीचा निस्सिम आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
शिवण्या निलेश वाघ या विद्यार्थिनीने गणेशगांव येथील स्वयंभू गणपतीची हुबेहूब प्रतिकृति बनविली तर प्रज्वल संतोष भुजबळ याने वेगवेगळ्या आकाराच्या मण्यांचा वापर करून सुंदर बाल गणेश बनविला आहे.आज सर्व चिमुकल्यांनी आणलेले बाप्पा एकत्र विराजमान झाले आणी महादेव कोळेकर,शीतल भुजबळ,नलिनी चव्हाण यांनी पूजा करून गणपतीची आरती मुलांसोबत केली .






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा