संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
सध्या अकलूज शहरात विविध सण समारंभ साजरे होत असून अकलूज शहर हे मोठी बाजारपेठ असल्याने सध्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरीक खरेदी साठी मोठ्या प्रमाणात शहरात येत आहेत. त्या अनुषंगाने शहरात मोठ्या प्रमाणात एकल वापर प्लास्टिकचा वापर होत आहे, त्यामुळे आज दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी बाजारपेठेतील एका दुकानावर अचानकपणे अकलूज नगर परिषद आरोग्य विभाग व अतिक्रमण विभाग यांच्यातर्फे कारवाई करण्यात येऊन पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे. तरी शहरातील सर्व उत्पादक,विक्रेते,आस्थापना यांना अकलूज नगर परिषद वतीने सूचित करण्यात येते की,एकल प्लास्टिक वापर बंद असल्याने ते वापरू नये.अन्यथा नगर परिषद आपणावर दंड, जप्ती तसेच आस्थापना सील करणे या प्रकारे करवाई करण्यात येईल.त्यामुळे येणाऱ्या विवीध सणा सुदीच्या दिवसात नगरपरिषद हद्दीत थर्माकोल, प्लास्टिक हँडल बॅग, सजावटीचे थर्माकोल इत्यादी गोष्टींवर बंदी घालण्यात आलेली आहे.
तरी शहरातील सर्व नागरिक,मॉल,हातगाडे,फळ विक्रेते,दुकानदार, स्वीट होम मार्ट,सर्व आस्थापना यांना आवाहन करण्यात येते की, बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर करू नये व होणारी कारवाई टाळावी. सर्व नागरिकांनी यापुढे होणारे सण समारंभ ,उत्सव हे पर्यावरण पूरक साजरे करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा