अकलुज ---प्रतिनिधी
शकुर तांबोळी
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे स्पर्शज्ञान कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याता म्हणून डॉ.श्रद्धा जवंजाळ अध्यक्षा सहारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या उपस्थित होत्या.
मुलींना आधुनिक युगात वावरताना चांगले व वाईट यांची जाण होऊन निर्भीडपणे जगता यावे ,हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्शज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते -पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रमुख व्याख्याता डॉ. श्रद्धा जवंजाळ या फिजिओथेरपिस्ट असून त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार इन आयकॉनिक ब्युटी इन दुबई यांसारखे अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
स्पर्शज्ञान कार्यशाळेत विद्यार्थिनींना किशोर वयात होणारे शारीरिक बदल ,आहार पद्धती, गुड टच व बॅड टच कसे ओळखायचे याबद्दल प्रात्यक्षिकांसह माहिती सविस्तरपणे सांगण्यात आली.
त्यानी आपल्या भाषणातून विद्यार्थिनींना आजच्या युगातील गरज म्हणजे फाईट ऑर फ्लाईट आहे असा मोलाचा संदेश दिला.
या उपक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव ,पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे, शिवाजी थोरात ,भाग्यश्री गुजरे, सोनाली चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाझिया मुल्ला यांनी केले तर आभार प्रतिभा राजगुरू यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा