Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

अकलूजच्या आनंदी लिनेस क्लब ने घेतली "आईच्या मातृत्वाच्या प्रेमाची दखल".

 


अकलुज ---प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

                       अकलूजमधील नवीन एसटी स्टँडमध्ये स्तनदा मातांसाठी आणि गरजू महिलांसाठी,महिला सुरक्षितता आणि सन्मान पर आनंदी लिनेस क्लबच्या महिलांच्या वतीने केली हिरकणी कक्षाची निर्मिती नुकतीच करण्यात आली आहे त्यांचे उद्घाटन अकलूज पोलीस उप विभागीय अधिकारी सई भोर-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

        आज-काल महिला आपल्या लहान तान्ह्या लेकरांना घेवून घराबाहेर पडून आपल्या घरासाठी अनेक कामे प्रवास करत पार पाडत असतात अशा वेळेला प्रसंगी एसटी स्टँडवर बसची वाट पाहत थांबावे लागते. त्यावेळी लेकरांना भूक लागली असता त्यांच्या मनाचा कोंडमारा होतो.ह्या गोष्टीची दखल घेऊन आनंदी लिनेस् क्लबच्या अध्यक्षा सौ.छाया बुराडे यांनी एसटी व्यवस्थापक व अधिकारी यांच्याशी चर्चा करून हिरकणी कक्षची संकल्पना मांडली आणि सर्व खर्च लिनस क्लबमधील महिला उचलतील अशी ग्वाही दिली.आज प्रत्यक्षात हिरकणी कक्ष उभारून करून त्याचे उद्घाटन प्रेरणादायी पोलीस अकलूज पोलीस उप विभागीय अधिकारी सई भोर-पाटील यांच्या शुभ हस्ते हस्ते करण्यात आले.

            या उद्घाटनप्रसंगी अकलूज पोलीस स्टेशन नागझीन तांबोळी उपस्थित होत्या आणि आनंदी लिनेस क्लबमधील सर्व सदस्य महिला उपस्थित होत्या. आनंदी लिनेस क्लबच्या अध्यक्षा सौ.छाया बुराडे आणि सचिव राजश्री जगताप आणि खजिनदार सौ विद्या गिरमे यांनी पोलीस उप विभागीय अधिकारी सई भोर-पाटील यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.यावेळी उपस्थित एसटी महामंडळमधील अधिकारी यांचा सत्कार लिनेस् क्लबच्या वतीने करण्यात आला.

             या कार्यक्रमाला उपाध्यक्ष सौ.संगीता दोशी, सदस्या सौ.सोनल शहा,सौ.विद्या गिरमे,सौ.संध्या जाधव,सपना गांधी, योगिता ओसवाल,स्नेहा गिरमे,हेमा माने,शोभा चंदनशिवे,मंजू पवार,मीना मगर,उपस्थित होत्या

         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाया बुराडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. सुप्रिया मुदगल यांनी केले तर आभार सौ.राजश्री जगताप यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा