भाजप शहर( उत्तर) आयोजित शासकीय योजना शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
सोलापूर : राज्य व केंद्र शासन जनसामान्यांच्या हितासाठी राबवित असलेल्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पक्ष शहर उत्तर च्या वतीने शासकीय योजना शिबीरात प्रधानमंत्री स्वनिधी योजना व जनधन बचत खाता योजनेच्या माध्यमातून पंजाब नॅशनल बॅंकेकडून एका दिवसात बॅंक खाते उघडून देण्यात आले. याप्रसंगी सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील साखर पेठेत आनंद गोसकी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी, ९ ते १० सप्टेंबर दरम्यान दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत छोट्या व्यवसायिकांना भांडवलासाठी १० हजार रूपये कर्ज मिळते. या कर्जाचे परतफेडीचे हफ्ते दरमहा ८२५ ते ९०० रूपये हफ्ता असतो. या कर्जाची परत फेड केल्यावर ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळते. या योजनेच्या इच्छुक छोट्या व्यवसायिकांनी कर्ज फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली होती.
'आत्मनिर्भर भारत ते समृध्द भारत योजना' साकारण्यासाठी केंद्र व राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता, शिबीराचा कालावधी एका दिवसाने वाढविण्यात आला. सोमवारी, ११ सप्टेंबर रोजी या शिबिराचा समारोप झाला. शिबीरात जवळपास पाचशेहून अधिक छोट्या व्यवसायिकांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत कर्जासाठी अर्ज दाखल झाले असल्याचे आनंद गोसकी यांनी सांगितले.
या शासकीय योजना शिबिरास सोलापूर महापालिकेचे युसीडीचे प्रमुख उज्वला गणेश,साईप्रसाद पोळ, जाधव मॅडम, पल्लवी जिंदम,सीएसीचे चे ग्राहक सेवा केंद्र आकाश बुर्ला, नेहा बुर्ला आणिआनंद गोसकी मित्र परीवाराकडून व्यंकटेश केंची, दिलीप मुमुडले, महेश दासी, चिलवेरी, शुभम मिठ्ठा, शंकर म्हंता, वसंत कामुर्ती, माधव कोटा, दिनेश सुरा, मोहन कनकी, मिलींद कोंडा, बसवराज गडगी यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा