Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २ जुलै, २०२५

*अकलूज येथील "शिक्षण प्रसारक मंडळा"च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या ४ जुलै रोजी सत्कार समारंभाचे आयोजन*

 



*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळातील इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी परीक्षेतील एकूण १४५ गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा शुक्रवार दिनांक ४ जुलै रोजी स्मृतीभवन शंकरनगर येथे सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे.हा सत्कार समारंभ संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहेत.



            महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षण संस्था पुरस्काराने गौरवलेल्या शिक्षण प्रसारक मंडळातील ३३ शाखेतील मार्च २०२५ मधील इयत्ता १० वीचा निकाल ९५.११ टक्के लागला. १० वी मध्ये ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या ९८ व शाखावर प्रथम आलेल्या १६ अशा एकूण ११४ गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार होत आहे.तर १२वी च्या परीक्षेत संस्थेच्या ७ शाखेतून ९५.७१ टक्के निकाल लागला.१२ वीच्या ८० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या २१ विद्यार्थ्यांचा,१०० गुण प्राप्त केलेल्या ३,व्यवसाय विभागातील ४,शाखावर प्रथम आलेले ३ असे १२ वीचे एकूण ३१ गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार होत आहे.इयत्ता १० वी व १२ वी मिळून १४५ विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

इयत्ता १० वी परीक्षेत कु. पौर्णिमा भांगे तिने९८.२० टक्के गुण मिळवत संस्थेत प्रथम तर सिफा तांबोळी ९७ टक्के व ओंकार राऊत ९७ टक्के मिळवित विभागून द्वितीय क्रमांक पटकावला.आर्या कुलकर्णी,इंद्रनील चव्हाण, गौरांग जामदार या तिघांनी ९६.८० टक्के मिळतील विभागून तृतीय क्रमांक पटकावला.तर १२ वीत वरद कोतमिरे याने ८९.८३ टक्के मिळवित संस्थेत प्रथम तर कु.मनाली भुजबळ यांनी ८९.५० टक्के मिळवित द्वितीय व कु. क्रांती पांढरे हिने ८९ टक्के मिळवित तृतीय क्रमांक पटकावला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा