संजीवनी मगर यांना इनरव्हिल क्लबच्या वतीने नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित
अकलूज -----प्रतिनिधी
केदार---लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
मो-9890 095 283
इनरव्हिल क्लब सोलापूर व अकलूज यांचे विद्यमाने शिक्षक दिनाचे निमीत्ताने नेशन बिल्डर या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.हा सन्मान सोहळा सौ.सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील व सिने अभिनेते मिलींद गुणाजी यांचे हस्ते पार पडला.
सौ.संजीवनी लालासाहेब मगर यांना आदर्श शिक्षीका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्या १९९२ सालापासून अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागात गेली ३१ वर्ष शिक्षीका पदावर कार्यरत आहेत.एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे.विद्यार्थांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देत.कला,क्रिडा इत्यादी क्षेत्रात विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडविणे.आजपर्यंत हजारो विद्यार्थी सुसंस्कारित घडविले आहेत.गरीब विद्यार्थी दत्तक घेणे.गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे.विविध स्पर्धा,उपक्रम राबवून मुलांना प्रोत्साहन देणे.त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे.त्यांच्या या कार्याबद्दल इनर व्हील क्लबने आदर्श शिक्षीका म्हणून नॅशनल बिल्डर अवार्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळा प्रसंगी डिस्टीक प्रमुख मुक्ती पानसे मॅडम,डॉ.मानसी देवडीकर,डॉ.अर्चना गवळी,डाॅ.तृप्ती सिद,डॉ.सारंगा गिरमे,डॉ.कांबळे यांचे सह आदिती थिटे,अमोलिक जामदार,शीतल दळवी व सर्व सन्मानार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.श्रध्दा जवंजाळ व इनरव्हिलचे सर्व सदस्य यांनी केले होते.
सौ.संजीवनी मगर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते- पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील व मुख्याध्यापिका,शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा