संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवकांचे हृदयसम्राट जयदिपभाई जोगेंद्र कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प केला आहे.
२३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांचा वाढदिवस महाराष्ट्र युवक आघाडीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे फळे व बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी आजच्या दिवशी मरणोत्तर अवयव दान करण्याचा संकल्प उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गुडे यांना बोलून दाखविल्यानंतर डॉ.गुडे यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करून मरणोत्तर अवयव दान करण्याचा ऑनलाईन फॉर्म भरून प्रमाणपत्र दिले.
मरणोत्तर अवयवदानामध्ये मूत्रपिंड,यकृत,हृदय,नेत्रपटल, फुफ्फुस,आतडे,स्वादुपिंड,हाडे,हृदयांच्या झडपा,त्वचा,रक्तवाहिन्या इत्यादींचा समावेश असून यातून कित्येक रुग्णांना याचा फायदा होणार आहे. यावेळी बोलताना युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले म्हणाले की आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केल्याचा आनंद होत आहे.माझे संपूर्ण आयुष्य मी समाजासाठी व आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित केले असून जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी लढत राहणार असून मी मेल्यानंतर ही माझ्या अवयवांचा उपयोग रुग्णांना होऊन त्यांचे जीव वाचणार असल्याचे समाधान मला वाटते यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष खडतरे,वरिष्ठ क्लार्क मोरे,सुनिल खांडेकर,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शिवाजी खडतरे,पांडुरंग चव्हाण,शिवम गायकवाड,अशोक कोळी,शहाजी खडतरे,राजू बागवान,ऋतुराज थोरात,आदेश थोरात,अर्जुन जाधव,सया शिंदे,अर्जुन कोळी,अरुण कोळी,सचिन कोळी,विनोद चौगुले, भीमराव कांबळे,ऋषिकेश गायकवाड,संदिप पवार,रोहिदास तोरणे यांचेसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा