संपादक --हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्ष पदविका मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी चि. मंगेश जाधव याने श्रीराम पॉलिटेक्निक, पाणीव येथे दि. २५ व २६ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय टेक्निकल इव्हेंट (ज्ञानास्त्र) मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासासाठी तसेच विविध उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी शिक्षक नेहमीच परिश्रम घेत असतात. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये व सहभागामध्ये प्रा. योगेश शेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी व सर्व सहभागी विद्यार्ध्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, विभागप्रमुख प्रा. स्वप्नील निकम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा