Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

भांबुर्डी ता.माळशिरस येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक पणा बद्दल प्रेस संपादक व पञकार संघाच्या वतीने सत्कार.

 


विशेष ----प्रतिनिधी राजु (कासिम) मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

                             प्रेस संपादक व पत्रकार संघाच्या वतीने गुरुराज पाटील व प्रशांत वाघमोडे या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला.


भांबुर्डी तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ७ वीतील विद्यार्थी गुरुराज धाईंजे व इयत्ता ६ वीतील प्रशांत वाघमोडे या दोन विद्यार्थ्यांनी सापडलेले पाकीट आपल्या शिक्षकांकडे सुपूर्द केले शिक्षकांनी पाकिटाच्या मालकाचा शोध घेऊन त्याला त्याच्या स्वाधीन केले या पाकिटात रोख रक्कम आधार कार्ड, पॅन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती हल्लीच्या धक्काबुकीच्या काळात या दोन विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्या दोघांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक कमिटीचे अध्यक्ष संजय वाघमोडे, उपाध्यक्ष रणजीत तिकूटे, सदस्य दीपक वाघमोडे, संतोष भोसले, पांडुरंग धाईंजे, उज्वला धाईंजे बाळू वाघमोडे, सुमन वाघमोडे, राणी वाघमोडे, मुख्याध्यापक अनिल भगत शिक्षक दिनेश ननावरे व सहदेव घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा