Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ ऑक्टोबर, २०२३

महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने इंदापूर तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांचा बेमुदत संप

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                          - इंदापूर तालुक्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या १४ गटप्रवर्तक व २९४ आशा स्वयंसेविकांचा विविध मागण्यासाठी १८ आक्टोंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे. गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना निवेदन देण्यात आले आहे.



    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात ७० हजार आशा स्वयंसेविका व चार हजार गटप्रवर्तक कार्यरत आहे. मागील सप्टेंबर २०२३ मध्ये राज्यातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, आशा स्वयंसेविकांना ऑनलाईन कामे करण्याची होत असलेली सक्ती व दडपशाही त्वरित थांबवावी, दिवाळी बोनस देण्यात यावा, आशा स्वयंसेविकांना किमान वेतन लागू करावे, केंद्र शासनाच्या मोबदल्यात वाढ मिळवून द्यावी, गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, तसेच प्रवास खर्च वेगळा द्यावा व ऑनलाईन कामे सांगू नयेत.



    याबाबत आंदोलन केलेनंतर सहसंचालक यांनी आयुक्त व मंत्री महोदया सोबत मिटींग घेऊन आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासन ची पूर्तता करण्यात आली नाही. उलट आशा व गटप्रवर्तक यांच्यावर दडपशाही करून जबरदस्तीने सक्तीने ऑनलाईन काम करून घेतली जात आहेत. कोणतीही साधने उपलब्ध नकरता ऑनलाईन काम करून घेणे ही अन्यायकारक बाब आहे. त्यामुळे कृती समितीच्या निर्णयानुसार (दि. १८ ऑक्टोबर) पासून मागण्यासाठी राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक बेमुदत संपात उतरणार आहेत. 

     याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना देण्यात आले. यावेळी रेश्मा सय्यद, जकीया शेख, अनिता जाधव, लतिका व्यवहारे, जयश्री नगरे, प्रभावती काडाळे, साधना कांबळे, पल्लवी मोरे, राणी राऊत, योगिता यादव, लता पवार, सुंदर शेंडगे, रुपाली पांढरे, नंदा गोसावी, अनिशा सय्यद, रुपाली साठे, अर्चना गोरड, छाया येडे, अश्विनी खरात, ज्योती सुतार, सुनंदा कांबळे, पूजा जगदाळे, कविता चंदनशिवे, वैशाली शिंदे आदी आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या. पुणे जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांनी बेमुदत संपाची तयारी करावी असे कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड निलेश दातखिळे यांनी सांगितले. 

फोटो - इंदापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना निवेदन देताना आशा व गटप्रवर्तक दिसत आहेत.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा