इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल -8378081147
- गणेशवाडी गारअकोले यांना जोडणाऱ्या पुलाजवळील भिमा नदीत अनोळखी पुरुष जातीचे मयत पाण्यावर तरंगताना आढळून आले. टेंभुर्णी पोलीस स्टेशनला अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे.
गणेशवाडी पुलाजवळील भिमा नदीत अनोळखी पुरुष जातीचे मयत ( वय ३० ते ३५ वर्ष ) अंगात पोपटी रंगाचा फुल बायाचा शर्ट, त्यामध्ये पांढरा टी-शर्ट तसेच काळे रंगाची जीन्स पॅन्ट, त्यावर पांढरे व पिवळे रंगाने इंग्रजीमध्ये अक्षर लिहिलेली व निळ्या रंगाची अंडरवेअर सदर इसम गारअकोले शिवारातील भीमा नदी पात्रातील पाण्यात तरंगताना मयत अवस्थेत मिळून आला आहे. सदर व्यक्तीची ओळख होण्यासाठी त्याचे नातेवाईकांचा परिसरात शोध होण्यास मदत हवी आहे. त्यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार आर. एम. लांडगे मोबाईल संपर्क क्रमांक ९६७३८१२००९ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन टेंभुर्णी पोलीसांकडून करण्यात आले आहे.
फोटो - भिमा नदीत अनोळखी पुरुष जातीचे मयत
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा