गणेशगाव ----प्रतिनिधी
नुरजहाँ शेख.
टाइम्स 45 न्युज मराठी
पाणी हेच जीवन आहे त्याचा जपून वापर करा हा संदेश शासनाच्या वतीने नेहमीच सांगितले जातो पण हा संदेश प्रत्येकाने पाळायलाच हवा.पण गणेशगांवातील बंधा-यांच्या दाराला छिद्रे पाडल्यामुळे या बंधाऱ्यातील पाणी वाहून जाऊ लागल्यामुळे पिकांसाठीचे हक्काचे पाणी वाहून जात असलेले पाहून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
गणेशगांवच्या बंधाऱ्याचे पाणी ज्या दारांनी पाणी अडवले जाते त्या सर्व दारांना मोठ मोठी छिद्रे पडली असल्यामुळे त्या बंधा-यांच्या दारांची चाळण झाली आहे.खूप दिवस निरा नदी कोरडी पडलेली होती.नदीला पाणी कधी येईल.या कडे बळीराजा डोळे लावून बसला होता.पण गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी आता दुथडी भरुन वाहू लागली आहे.अखेर नदीला पाणी आले म्हणून शेतकरी वर्ग सुखावला होता परंतु गावाकऱ्यांच्या नशिबाची झोळी फाटकीच निघाली.या झोळीला ठिगळ लावण्याची धडपड गावाकऱ्यांची चालू आहे.पाटबंधारे विभागाच्या ढिम्यास कारभारामुळे बंधा-यातील पाणी वाहून जाऊ लागल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
या गावातील सर्व लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे या वर्षी पाऊसाचे प्रमाण अतिशय कमी होते म्हणून पाण्याच्या थेंबा थेंबाला वाचवले पाहिजे असे बळीराजाला वाटतेय पण हे अमृततुल्य पाणी या निकृष्ठ दारांच्या चाळण्यांनी अडवायचे का ? पाटबंधारे विभागाने तात्काळ लक्ष देऊन दुर्दैवी शेतकऱ्यांना मदत करावी अशी शेतकरी वर्गातून अंतर्मुख हाक आहे.ती हाक पाटबंधारे विभागातील अधिका-यांपर्यंत कधी पोहचणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा