टाइम्स 45 न्युज मराठी
"पुसेसावळी " हत्याकांडाचे उद्दिग्न प्रतिबिंब संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना , कृतिशील पुरोगामी विचाराच्या सन्माननीय पंक्तीत असणाऱ्या सांगली शहरात देखील "नुरुल हसन" यांच्या हत्येविरोधात लाक्षणिक आंदोलन झाले . मुस्लिम समाजाच्या अन्यायाला वाचा कधी फुटणार ???
भारताचा "अविभाज्य" भाग असणाऱ्या मुस्लिमांच्या भावनांचा बांध फुटण्याची वाट पाहणाऱ्या जातीयवाद्यांना "सरकार" कधी रोखणार ???
वारंवार होणारे सामूहिक हल्ले ( मॉब लिंचिंग) आणि हल्ल्याला बळी पडणारा मुस्लिम समाजच केंद्रबिंदू का ???
आंबे खाल्याने गरोदर होता येते असे सांगणाऱ्या "वाचाळवीरांनी" राष्ट्रपती महात्मा गांधींच्या बद्दल जेंव्हा अनुदगार काढले, अपशब्द काढले तेंव्हा त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल झाला ???
जर ही "चूक" एखाद्या मुस्लिम बांधवानी केली असती तर "फास्ट ट्रॅक" कोर्टात खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यात आले असते. अन्यधर्मीय असेल तर "एक न्याय" आणि मुस्लिम - बहुजन असेल तर वेगळा न्याय , असे का ???
जर एखाद्या निरपराधाचा "बळी" गेल्यावर आरोपीना शिक्षा मिळत नसेल आणि आरोप करणारे आणि क्रांतिकारांची निंदा करणार्यांना देखील "मोकळे कुरण" मिळत असेल तर जनतेने जाब कुणाकडे मागायचा ??
पुसेसावळी येथील वास्तू विशारद (इंजिनियर ) असणाऱ्या निष्पाप नुरुल हसन ला सामूहिकपणे हत्या करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई केंव्हा करणार ???
काही महिन्यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यानंतर ,संत -हजरत "साईबाबांवर " देखील खालच्या पातळीवर "शिंतोडे" उडवण्यात आले ,समस्त साईबाबा प्रेमी "संतप्त" झाले ,नाराज झाले . तात्पर्य , गुन्हा करणारे पंत असतील तर त्यांना "वेगळा न्याय" असतो का ???
नुरुल हसन याच्या 6 महिन्याच्या "गरोदर" असणाऱ्या पत्नीला आणि नुरुल हसन याच्या वृद्ध आई -वडिलांना न्याय कधी देणार ?? नुरुल हसन याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्याला फासावर कधी लटकवणार ???
सांगलीत किमान "40,000" मुस्लिम पुरुष ,परंतु आंदोलनात केवळ 400 !
"पुसेसावळी" प्रकरण घातक होते . भविष्यात असे प्रकार होता कामा नये याची दक्षता घेण्यासाठी ,सावधगिरी बाळगण्यासाठी , अल्पसंख्यांक संरक्षण कायदा निर्माण करण्यासाठी .. नुरुल हक यांच्या "कुटुंबियांना" न्याय मिळण्यासाठी सर्व मुस्लिमांसाठी हे आंदोलन होते .परंतु "बहुसंख्य" मुस्लिम अजूनही गाफिल असल्याचे दिसलें .कारण मुस्लिमांची उपस्थिती केलेल्या आवाहनाच्या मानाने अतिशय तुरळक होती . मुस्लिम केंव्हा जागा होणार ?? हाच यक्षप्रश्न आहे .
मराठा बांधवांचा उत्स्फुर्त प्रतिसाद !
मराठा बांधवांची मुस्लिमांच्या ईद ऐ मिलाद या सणादिवशी ,"शोभायात्रेत" अनुपस्थिती दर्शवली होती .तथापि ती "उणीव" आज भरून निघाली .(त्यासंदर्भात मी लेख ही लिहिला होता )
मुस्लिम समाजावर होणाऱ्या हल्ल्याच्या पाश्वभुमीवर या आंदोलनात सर्व मराठा -बहुजन बांधवानी सहभाग नोंदवून मुस्लिम समाजाच्या पाठीशी असल्याचे दाखवून सर्वधर्मसमभाव खऱ्या अर्थाने सिद्ध केला. सर्वच मान्यवरांनी "सडेतोड तडाखेबंद भाषण "केली .
ज्या वक्त्यांनी भाषणे केली त्यांची नावे खालील प्रमाणे 1) मा. आ.शरद पाटील 2) पृथ्वीराज पाटील 3) संजय बजाज 4) मैनुद्दीन बागवान 5) दिग्विजय सूर्यवंशी 6) पद्माकर जगदाळे 7) ॲड. अजित सूर्यवंशी 8) सतीश साखळकर 9) करीम मिस्त्री 10) ॲड.अमित शिंदे 11) नितीन चव्हाण 12) अय्याज नाईकवडी 13) जैलाब शेख 14) अभिजित भोसले 15) संतोष पाटील 16) प्रमोद सूर्यवंशी 17) नितीन मिरजकर 18) सुरेश दुधगावकर 19) ज्योती आदाटे 20) उत्तम मोहिते 21) उत्तम आबा कांबळे 22) फारूक गवंडी 23) सोमनाथ साळुंखे 24) प्रा .राणी यादव 25) शाकीर तांबोळी 26) आयुब पटेल आदी .
मुनीर मुल्ला यांचा पुढाकार !
न्यायहक्कासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनास परवानगीसाठी कार्यकर्त्यांना 6 वेळा "हेलपाटे मारावे लागले. पोलिसांच्या "कानपिचक्या - सल्ला" स्वीकारत सामाजिक कार्यकर्ते मुनीर मुल्ला यांनी आंदोलन खऱ्या अर्थाने "यशस्वी" केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन !
यशाचे श्रेय घेण्यास पुष्कळ लोक "पुढे" येतात तथापि कार्यक्रमाला गालबोट लागले असते तर "संयोजक" शिव्यांचे आणि टीकेचे धनी झाले असते .अर्थातच हे सर्व माहित असूनही सर्व उदयोन्मुख कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखविले .
कार्यक्रमस्थळीचा मांडव , खुर्च्या ,स्पीकर, आणि आंदोलनाची परवानगी आणण्यापर्यंत ज्यांनी तन - मन - धन काम केले त्या ग्राउंड लेव्हल च्या कार्यकर्त्यांचा "सन्मान" झालाच पाहिजे. त्याशिवाय कार्यक्रमाचा 15 हजार रुपयांचा खर्च या सर्वानी "उचलला" आहे . अशा "दिलदार" कार्यकर्त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करायलाच हवा .त्या कार्यकर्त्यांची नावे पुढीलप्रमाणे ....
मुनीर मुल्ला ,हंजल बावा ,अक्रम शेख , अजीम पठाण ,तोहीद शेख ,फारूक शेख ,करीम मुजावर ,जमील मुल्ला ,असिफ इनामदार ,समीर शेख , सर्फराज शेख ,सुहेल शेख आदी.
कार्यक्रमास मुस्लिम समाजातील समस्त सन्माननीय बांधव उपस्थित होते .यामध्ये युनूस महात, अमन पठाण , युसूफ जमादार ,कय्युम पटवेगार , आयुब बारगीर ,सलीम पन्हाळकर, उमर गवंडी, , लालू मेस्त्री ,सुफियान पठाण ,हाफिज सद्दाम , मुन्ना शेख ,सोहेल बलबंड , सोहेल इनामदार , टिपू इनामदार ,अजीम पठाण शकील पिरजादे , फजल जमादार यांच्यासह अनेक सन्माननीय नागरिक उपस्थित होते .प्रत्येकाची नावे लिहिणे शक्य नाही..क्षमस्व !
असो ..या आंदोलनाची दखल घेतली जाईल आणि नुरुल हसन यांना "न्याय" मिळेल ही अपेक्षा !
इकबाल बाबासाहेब मुल्ला
( पत्रकार)
संपादक - सांगली वेध .
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा