अकलुज --- प्रतिनिधी
शाकुर - तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे भोंडला कार्यक्रम संपन्न झाला .कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नितीनराव खराडे ,सभापती प्रशाला समिती ,जेष्ठ महिला कांचन गायकवाड, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा अश्विनी एकतपुरे हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा परिचय होऊन हा सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री गुजरे यांनी केले. माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते- पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. मान्यवरांचा सन्मान प्रशालेच्या वतीने पार पाडला. नवमातांच्या शारदोस्तवात आनंदाची पर्वणी म्हणून "जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा " स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या अवनी नवगिरे ,गौरी ननवरे ,वैभव ठोंबरे ,जानवी खांडवे विद्या टेकाळे ,आरती जाधव, सायली गाढवे ,मोहित लोखंडे या सर्व खेळाडूंचा व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा मार्गदर्शक अनिल जाधव ,अनिल मोहिते व रामचंद्र चव्हाण यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
मान्यवरांच्या हस्ते हस्त पूजन करण्यात आले. ऐलमा पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलूबाई दोन लिंबू झेलू अशा भोंडल्यांच्या गीतावर सर्व विद्यार्थिनी व महिला वर्गाने फेर धरला. इयत्ता पाचवी ,सहावी व सातवीच्या वर्गातील मुलींनी विविध गीतांवर गरबा नृत्याचे सादरीकरण केले. खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम होऊन सर्व विद्यार्थ्यांना खिरापतीचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी माता पालक संघाच्या सदस्या रेखा बनकर, राणी झंजे, ललिता टेकाळे ,दिलशाद मुजावर ,प्रशालेचे उपमुख्याध्यापक भारत चंदनकर ,पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे ,शिक्षक प्रतिनिधी शिवाजी थोरात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा राजगुरू यांनी केले तर आभार रुकसाना नदाफ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हासिरून मुलाणी, प्रभावती लंगोटे, स्नेहलता एकतपुरे, जयश्री भगत ,वर्षाराणी तुपे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा