संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
आशिया खंडातील एक नंबर ग्रामपंचायत असणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर होऊनही येथील नागरिकांना अकलूज नगरपरिषदेकडून कोणत्याच सेवा सुविधा मिळत नाहीत.अकलूज नगरपरिषद अस्तित्वात आली आणि अकलूज नगरपरिषदेची कर वसुलीही सुरू झाली परंतु नगरपरिषदेच्या सेवा सुविधा अद्यापपर्यंत नागरिकांना दिल्या जात नाहीतअकलूज नगरपरिषद अंतर्गत क्रांतीसिंहनगर इंदिरा घरकुल या ठिकाणी रहात असणाऱ्या नागरिकांच्या घराच्या भिंतीला व पत्र्याला लागून गटारीतील गाळ व मैला बऱ्याच दिवसापासून साठलेला आहे.या साठलेल्या कचरा मैला व गटारीतील पाण्यामुळे नागरिकांच्या भिंती व घरामध्ये पाणी पाजरून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून येथील नागरिक मरणयातना सहन करून तसेच रहात आहेत गटारी कचरा दिवाबत्ती रस्ता याबाबत येथील नागरिकांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी करूनही त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही.अकलूज नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया थांबल्याने अकलूज नगरपरिषदेवर सध्या प्रशासक असून अकलूज नगरपरिषदेचा सर्व कारभार मुख्याधिकारी दयानंद गोरे हे पाहतात परंतु अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे व संबंधित आरोग्य विभाग प्रमुख हे आपल्या मर्जीतील लोकांचीच कामे करताना दिसत आहेत क्रांतिसिंहनगर इंदिरा घरकुल येथील नागरिकांनी अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना त्यांच्या व्हाट्सअपवर कचरा तुंबलेल्या गटारी रस्ता दिवाबत्ती साठलेली घाण याचे फोटो पाठवून व समक्ष भेटून या भागातील स्वच्छता करण्याची विनंती केली होती परंतु तक्रार करून आठ दिवस होऊनही अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे व आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचेसह आरोग्य विभाग प्रमुख यांच्या कामाची सखोल चौकशी करून त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.याबाबत येथील नागरिकांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्याकडेही लेखी तक्रारी देऊन संबंधितांवर कारवाई करून न्याय देण्याची विनंती केली आहे त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनेही वरिष्ठांकडे लेखी तक्रारी करून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा