Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

मी माझ्या पगार वर समाधानी आहे -सातारा चे गटविकास अधिकारी "सतीश बुध्दे" यांनी आपल्या कार्यालया समोर लावलेला अनोखा फलक.

 


संपादक ---हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.;- 9730 867 448

                             सातारा : शासकीय अधिकारी म्हटलं की त्यांच्या मागेपुढे करण्याबरोबरच कागद टेबलावरून हलविण्यासाठी अनेक प्रलोभने दिली जातात.चहापेक्षा किटली गरम या उक्तीप्रमाणे साहेबांपेक्षा त्यांच्या सहकाऱ्यांच्याही मागण्या वाढीव असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन सातारा गटविकास अधिकारी म्हणून रुजू झालेल्या सतीश बुद्धे यांनी चक्क आपल्या कक्षाबाहेर मी माझ्या पगारात समाधानी आहे हा फलक लावला आहे. विविध कामांच्या निमित्ताने पंचायत समितीत येणाऱ्या सर्वांचेच लक्ष हा फलक वेधून घेत आहे.


जावळी पंचायत समितीत यशस्वी काम केल्यानंतर सतीश बुद्धे यांनी साताऱ्यात गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार स्विकारला. शासकीय कार्यालयांमध्ये नवीन अधिकारी रूजु झाला की नवा गडी नवे राज्य ही कामाची पध्दत रूढ आहे. सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्विकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बुद्धे यांनी लावलेल्या या फलकामुळे अनेक एजंटांचे धाबे दणाणले आहेत. 


 राजकीय पदाचा धाक दाखवुन सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या मर्जीतले काम करण्याची कंत्राटी पध्दती बंद होण्यासाठी बुद्धे यांचा हा फलक उपयुक्त ठरणार आहे. आपल्या नावाखाली कोणीही गैरप्रकार करू नये असा स्पष्ट निरोपही बुद्धे यांनी याद्वारे दिला आहे. या फलकाने पंचायत समितीतील अवघे वातावरण ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे कागदावर वजन ठेवल्याशिवाय ज्यांच्या टेबलावरून कागदे हालत नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांची यामुळे भलतीच गोची झाली आहे.


लक्षवेधक ठरलेल्या या बोर्डावर ठळकपणे मजकुर लिहीला आहे. यात मी दौऱ्यावर असताना भेटू शकलो नाही तर मला खाली दिलेल्या मोबाइल क्रमांकावर निवेदने, तक्रारी, लेखी स्वरूपात (संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या अभिप्रायानंतर व्हाॅटस ॲप मेसेज नाव व गावाच्या उल्लेखासह) करावा’ असे नमुद करण्यात आले आहे.


कार्यालयात माझ्या नावाखाली कोणीही कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करू नये यासाठी हा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. लोकसेवक म्हणून नोकरी करताना शासनाकडून मिळणारा पगार पुरेसा असून अधिक माया जमविण्याची माझी इच्छा नाही. कार्यालयात काम करण्यासाठी कागदावर वजन ठेवण्याची गरज नाही, जे योग्य काम आहे ते मार्गी लागणारच याची सातारकरांनी खात्री बाळगावी.


सतिश बुद्धे, गटविकास अधिकारी,-- सातारा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा