श्रीपूर ---ज्येष्ठ,पञकार
बी.टी.शिवशरण.
टाइम्स 45 न्युज मराठी
श्रीपूर मध्ये माझा जवळचा मित्र मराठा समाजाचा आहे त्याचा मुलगा आंतरराष्ट्रीय चित्रकार मुर्तीकार आहे सध्या तो पुण्यात वास्तव्यास आहे वय बत्तीस वर्षे झाले लग्न जमत नाही पाहुणे येतात मुलगा पसंत पडतो पण त्यांना कसलीच जमीन नाही पक्के घर नाही साध्या घरात आई वडील रहातात आर्थिक परिस्थिती खुपच नाजूक त्यामुळे लग्न जमत नसल्याने हे कुटुंब पुर्ण तणावाखाली जगतात मुलगा पुण्यात वास्तव्यास आहे तेथे भाडोत्री खोलीत रहातो मुलगा देखणा निर्व्यसनी आहे स्वभाव अतिशय शांत मनमिळाऊ आहे पुर्ण लक्ष त्याचे कलेत आहे त्याने काढलेल्या अनेक चित्रांचे देशपातळीवर कौतुक होते अनेक पुरस्कार सन्मान मिळाले नामांकित कंपन्यांच्या स्पर्धेत काढलेल्या चित्रांना प्रथम पुरस्कार मिळाले त्या प्रित्यर्थ त्या कंपनीचे वतीने परदेश वारी ची संधी मिळाली ऐतिहासिक मुर्ती शिल्प बनवण्याचा हातखंडा छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य व देखणे पुतळे तैलचित्र बनवली या चित्रकाराने रेखाटलेल्या अनेक चित्रांना आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्कार प्राप्त झाले पण हा एवढा ताकदवान चित्रकार स्वतःचे घर बांधू शकला नाही त्याला अर्धा एकर नव्हे दोन गुंठे जमीन नाही त्यामुळे मराठा समाजाचा आहे पण जमीन जागा नसल्याने त्याचे लग्न जमत नाही मराठा समाजातील हा अत्यंत गुणी व नावाजलेला चित्रकार आर्थिक दृष्ट्या गरीब आहे मराठा समाजात या चित्रकारा सारखें अनेक तरुण अनेक कुटुंबे आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याने त्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याने मुला मुलींची लग्न जुळत नाहीत आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या सर्व मराठा समाजाला आरक्षण का दिलं पाहिजे हे वर नमूद केलेल्या अडचणी समस्या आहेत त्यांना सधन व धनदांडग्या मराठ्यांनी खरोखर आर्थिक सहकार्य केले पाहिजे अशी अनेक उदाहरणे राज्यात आहेत आरक्षणाचे नियम तरतूद कायदा अटी शर्ती या क्लिष्ट बाबीं मुळे मराठा समाजातील गरजवंत समाजाला न्याय मिळत नाही ही कुटुंब सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या उपेक्षित रहातात त्यांची प्रगती होत नाही माझा हा मित्राने साठी ओलांडली आहे केवळ आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याने जमीन जागा घर नसल्याने तो समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे या चित्रकारा च्या चित्रांचे अनेक शहरांमध्ये प्रदर्शन भरवली आहेत अकलूज येथील शिवसृष्टी मध्ये असणारी अनेक ऐतिहासिक पात्र असणारी शिल्प या कलाकाराने बनवली आहेत अशा हुशार होतकरू गरजू आंतरराष्ट्रीय चित्रकार मुर्तीकार याचे कुटुंबाचा सहानुभूती पुर्वक मराठा समाजाचे नेत्यांनी संघटना यांनी विचार करून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आलं पाहिजे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा