*निवडणुक --रणधुमाळी**
प्रतिनिधी ---रणनितीकार
टाइम्स 45 न्युज मराठी
- बावडा ग्रुप ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी जनतेतून सरपंच पदासाठी नऊ उमेदवारांनी तर सहा वार्डातील १७ जागेसाठी ११० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोधची शक्यता धुसर होऊन निवडणूक रंगतदार होणार अशीच चर्चा नागरीक व मतदारांमध्ये चर्चिली जात आहे.
बावडा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीच्या जनतेतून सरपंच पदासाठी व सहा वार्डातील १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. विहित मुदतीत दि. १६ ते २० आक्टोंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने व प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिलेसाठी आरक्षित आहे. तर सहा वार्डातील इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने व प्रत्यक्ष विहित नमुन्यात भरून दाखल केले आहेत.
जनतेतून सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नऊ उमेदवारांची नावे : १) फरजाना साजीद मुलाणी २) लक्ष्मी लहू कुर्डे ३) यास्मिन अमीर सय्यद ४) सारिका अजित टिळेकर ५) पुष्पा अशोक चव्हाण ६) समीना समीर मुलाणी ७) यास्मिन मुनीर आत्तार ८) पल्लवी रणजीत गिरमे ९) अंकिता नितीनकुमार आंदळकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर सहा वार्डातील १७ जागेसाठी ११० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
उमेदवारी अर्जांची छाननी (दि. २३) रोजी होणार असून (दि. २५) रोजी निवडणुकीतून माघार व चिन्ह वाटप होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी मलप्पा ढाणे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी अमोल हजगुडे काम पाहत आहेत.
सुरूवातीला दोन दिवस उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरताना सर्व्हर डाऊनची समस्या येत होती. त्यामुळे इच्छुकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी ५.३० वाजेपर्यंत निवडणूक विभागाच्या वतीने वेळ वाढवून देण्यात आली होती.
फोटो - निवडणूक रणधुमाळी
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा