श्रीपूर ---ज्येष्ठ पञकार
बी.टी.शिवशरण.
टाइम्स 45 न्युज मराठी.
मो.9527 456 958
महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापले आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत येत्या चोवीस तारखेला संपत आहे आज अकलूज मध्ये जरांगेपाटील यांनी चोवीस तारखे नंतर सरकारला एक तास ही मुदत देणार नाही असे ठणकावले आहे सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार ने काय भुमिका घेतली आहे त्यांनी काय प्रयत्न केले आहेत व जर मराठा समाजाला आरक्षण देणार आहात तर ते कसे व कोणत्या घटनात्मक अधिकारात देणार याचे स्पष्टीकरण अद्याप सरकार कडून आलेले नाही आणि कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आता गप्प बसणार नाही ही गरजवंत मराठा समाजाने ठरवले आहे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर जाहीर सभा घेऊन आरक्षणाचा मुद्दा समाजातील लोकांपर्यंत पोहोचवून समाज संघटित करून जागृत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे ही बाजू अशी आहे जर सरकारला कुणबी मराठा दाखले व आणखी पुरावे पाहिजे आहेत तर चाळीस दिवस त्यांनी महसूल विभागाकडून त्या दाखल्याची खातरजमा करून घेणे अपेक्षित होते निजाम राजवटीत कुणबी मराठा अशी नोंद असल्याचे काही सकृतदर्शनी पुरावे व तसे दाखले नोंद असल्याची माहिती मिळाली आहे मग सरकार चालढकपणा का करत आहे शिता वरुन भाताची परीक्षा हे तत्व त्यांनी लक्षात घेतले पाहिजे जे शहाण्णव कुळी मराठा असल्याने त्यांना कुणबी मराठा दाखले घ्यायचे नाहीत त्यांनी घेऊ नये व ज्यांना कुणबी मराठा दाखला घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा प्रश्न गरजवंत मराठा समाजाचा आहे त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे गरजवंत मराठा समाज शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक दृष्ट्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण काळाची गरज आहे आरक्षण देण्यासाठी वेळ लाऊन विनाकारण मराठा आंदोलन भरकटू देऊ नये आता पर्यंत सकल मराठा समाजाचे वतीने अनेक लाखोंचे मोर्चे शांततेत काढले आहेत आता वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्र सरकारने वेळकाढूपणा केल्यास जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा