विशेष प्रतिनिधी-----सोलापूर
टाइम्स 45 न्युज मराठी
- यंदा अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद दोन्ही एकाच दिवशी आले होते पण जश्ने ईद-ए- मिलादुन्नबी (स्व) जुलुस कमिटीने सामाजिक बांधिलकी, शांतता व सुव्यवस्थेचे दर्शन घडवत सण साजरे केले . २८ ऐवजी २९ सप्टेंबरला भव्य - दिव्य जुलूस पारंपारिक पध्दतीने विजापूर वेस येथून सालाबादप्रमाणे यंदाही मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शोभा यात्रा काढून समाजात एकमेकांच्या धर्माबद्दल आदर दाखवित समाजात चांगला एक चांगला मेसेज मुस्लीम समाजाने दिला.
शनिवारी के.एम.सी गार्डन येथे नियोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात काडादी बोलत होते.
पैगंबर जयंतीनिमित्त शहरात मोहल्ला सजावट, स्टेज डे कोरेशन, रोषणाई, बग्गी सजावट तसेच जुलसमध्ये प्रवचन (नात) पठण मुस्लिम बांधवांकडून करण्यात आली होती. मदरसामधील वीस हजार विद्यार्थी व विद्यार्थिनी मोहम्मद पैगंबर यांच्या पोशाख घालून नबी का दामन नही छ..डेंगे नारायण तकबिर... अल्ला हू अकबर अशा घोषणा देत जुलूस मध्ये सहभाग नोंदवला.
यात सहभाग घेतलेल्या मुस्लीम बांधवाना प्रोत्साहन मिळावे महणुन कमिटीच्या वतीने त्यांना बक्षीस देवुन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल, अक्कलकोटचे धर्मगुरू सुफी दातापिर, कमिटी अध्यक्ष हाजी. एम.डी. शेख, संस्थापक विश्वस्त हाजी मकबूलसो मोहोळकर, कार्याध्यक्ष पीरअहमद शेख, जाकीरभाई नाईकवाडी, शौकतभाई पठाण, डॉ अकलख वडवान, यांची प्रमुख उपस्थिती होती.
धर्मगुरु दातापीर महणाले सुफी संतानी मानवता वादाचा प्रसार व प्रचार केला व जगामध्ये सर्व धर्मियांना शांतीचा संदेश दिला.
प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ स्पर्धकाना रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
स्टेज डेकोरेशन
प्रथम -आसरा युथ फाऊंडेशन, द्वितीय- रामजाने मित्रपरिवार,
तृतीय- स्टार सोशल ग्रुप कौतम चौक याना मिळाला आहे.
मोहल्ला सजावट
प्रथम- शास्त्रीनगर सिरत कमिटी
द्वितीय -सैफु मणियार, फैज इनामदार बाषा पेठ,
तृतीय - मोदी यंग स्टार ग्रुप सरफराज शेख यांना मिळाली आहे.
उत्तेजनार्थ सप्रधक पुढीप्रमाणे
मुस्ताक पटेल, मदिना युवक संघटना, शेळगी
राऊफ शेख, चांदणी चौक फॉरेस्ट,
शहाजहुर ग्रुप नई जिंदगी सिद्धेश्वर नगर भाग- ४, सोहेल हफिसाब, बब्बु फुफा नई जिंदगी,
ताजुदीन मोहोलकर, बारा इमाम चौक युवक संघटना,
बाबा अड्डेवाले, मुस्लिम बाशा पेठ ,
सुन्नी दावत - ए इस्लामी, आदींना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी जाकीर भाई नाईकवाडी, पी रअहमद शेख, इरफान भाई शेख, ताजुद्दीन हत्तुरे, अजमल शेख, वाहिद बिजापुरे, ताजुद्दीन मोहळकर, रौफ शेख, जलाल शेख, शिवकुमार चलवादी, रमजान चिंचोळकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा