Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ ऑक्टोबर, २०२३

माळीनगर येथे कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या कडून ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम संपन्न

 


गणेशगाव ---प्रतिनिधी

नुरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

                      माळीनगर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ -राहुरी , संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रण याचे प्रात्यक्षिक माळीनगर येथील शेतकऱ्यांना करून दाखवले तसेच बुरशीनाशक वापरल्याने पीक उत्पादनात वाढ होते असे कृषी कन्यांनी सांगितले.यासाठी एक किलो मोरचूद रात्रभर ५० लिटर पाण्यामध्ये भिजत घालावा. प्लॉस्टिकच्या दुसऱ्या ड्रममध्ये ५० लिटर पाण्यात एक किलो चुना भिजत ठेवावा. हे दोन्ही द्रावण काठीने हलवून घ्यावे. मोरचूद आणि चुन्याचे द्रावण तिसऱ्या १०० लिटर ड्रममध्ये समप्रमाणात ओतत राहावेत. मिश्रण ओतताना ते काठीने ढवळत राहावे. या तयार झालेल्या मिश्रणाला बोर्डो मिश्रण असे म्हणतात. याप्रसंगी कार्यक्रम समन्वयक प्राचार्य नलावडे प्रा. एस एम एकतपुरे प्रा. एमएम चंदनकर प्रा. एच व्ही कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीदुत भाग्यश्री कदम ,आकांक्षा मोरे ,लक्ष्मी कोरे, श्वेता भडंगे ,रोहिणी गोलेकर, मेघना मोरे ,प्रशाली पवार, अंकिता भोगवडे ,प्रणाली देशमुख, इत्यादी कृषी कन्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा