श्रीपूर ---ज्येष्ठ पञकार
बी.टी.शिवशरण .
टाइम्स 45 न्युज मराठी
मो;-9527 456 958
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतर आंबेडकरी चळवळ व्यापक गतिमान व्हायला पाहिजे होती पण हल्ली चळवळीतील अंगार फुलण्याची नितांत गरज असताना दलित ऐक्य होणे काळाची गरज बनली आहे विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे एकीत जय बेकीत क्षय याचा अर्थ समाज संघटित होऊन एक झाला पाहिजे डॉ बाबासाहेब असेही म्हणाले होते समाजाचा रथ मी इथ पर्यंत आणून ठेवला आहे तुम्हाला पुढे जरी नेता येत नसेल तर तेथेच राहू द्या पण तो रथ निदान मागे ओढू नका आज चळवळीचे प्रेरणास्रोत व विचार हेतुपुरस्सर विसरले जात आहेत आज आपल्या बापाने आपल्याला ज्या नरकयातनेतून बाहेर काढून हे सुखा समाधानाचे दिवस पहाण्याचे भाग्य दिले शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि तो घेणारा गुरगुर ल्या शिवाय राहणार नाही डॉ बाबासाहेब यांना त्यावेळी किती त्रास यातना उपेक्षा मानहानी सहन करावी लागली पण त्यांनी आपला शिक्षणाचा उद्देश ज्ञानार्जन घेऊन सामाजिक परिवर्तन घडवून आणले त्यावेळी संपूर्ण देश सनातनी विचारांचा कर्मठ रुढी परंपरा जातीवाद धर्मवाद यामुळे त्यावेळी या देशात कुत्र्या मांजराला व पशूंना किंमत होती पण दलितांना नव्हती त्यावेळी बाबासाहेब कसे शिकले असतील त्यांनी त्यावेळी सनातन कर्मठ रुढी परंपरा वातावरणांत आपलं जिवन घडवलं असेल रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या ज्ञानाने बुध्दी वैभवाने संपूर्ण देश आपल्या कडे वळवला त्यांचे मतपरिवर्तन केले प्रत्येकाला काळ हे उत्तर असते म्हणतात ज्या देशात मनुवादी व्यवस्था होती माणसाला माणूसपण नाकारले होते माणसांचा विटाळ मानला जात होता मनुवादी व्यवस्था या देशात होती तीच मनुवादी व्यवस्था उध्वस्त करण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले व स्वतंत्र भारताचे संविधान लिहिले हा चमत्कार जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही झाला नसेल पण बुध्दी शिक्षण ज्ञान अभ्यास या जोरावर त्यांनी करुन दाखवले ते म्हणाले होते हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही यात स्वतःला अपयश आले तर स्वतःला गोळी घालून घेइन केवढा आत्मविश्वास किती जिद्द होती त्यांच्यात चौदा आकटोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांना त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली क्रांती केली असा महामानव जन्माला एकदाचं येतो निसर्गाला सुध्दा तशी मुस पुन्हा बनवता येणार नाही त्यांच्या पश्चात त्यांचे अनुयायी आज कुठे जाणे अपेक्षित होते चळवळ गट तट नेतृत्व वाद यात अडखळली आहे मुठभर लोक शिकून पुढे गेले ते समाजाकडे पाठीमागे वळून पहात नाहीत ही शोकांतिका आहे ते म्हणाले होते की तुम्ही शासनकर्ती जमात व्हा पण कशाचे काय चळवळीला फुटीचा शाप आहे समाज दुभंगलेल्या स्थितीत आहे तरुण व्यसनाधीन होऊन आपली जिंदगी बरबाद तर करतातच अशा तरुणांमुळे समाजाचे नुकसान झाले आहे हल्ली आरक्षणाचा मुद्दा कळीचा झाला आहे जे पिढ्यान् पिढ्या उच्चवर्णीय म्हणून व्यवस्थेत कारभारी म्हणून समाजकारण राजकारण व सत्ताकारण ज्या समाजाने केले ते आता मागासलेल्या समाज प्रमाणे सवलती साठी एकत्रीत येत आहेत त्यांच्या प्रस्थापित वाडवडिलांकडे जमीनदारी इस्टेट होती बारदाना सालगडी होते ते आता त्यांचे कुटुंब वाढले वाटण्या झाल्या त्यामुळे जमीन कमी झाली या मुद्द्यावर एक होऊन सरकार वर दबाव आणून आरक्षण मिळवण्यासाठी कोटींचा मेळावा घेत आहेत पण पिढ्यान् पिढ्या ज्यांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत होती गावात घर नव्हते रानात शेत नव्हत गावात पत नव्हती ज्यांच्या शेकडो पिढ्या कुत्र्या मांजरा प्रमाणे वागवल्या तो समाज आपलं पहिलं दिवस विसरला बाबासाहेब यांचा संदेश शिकवणं विसरला आपल्या गळ्यातील गाडगे पाठीचा खराटा विसरला तो समाज गटातटाचे चिखलात रुतून बसला नेतृत्वासाठी दुसर्यांची आजही सत्तेच्या एका तुकड्यासाठी लाचारी करतो भविष्यात जर या चुका सुधारून जर आपण एक होणार नसू तर आपला कार्यकाळ निश्चित अंधारात गेल्या शिवाय राहणार नाही आंबेडकर विचारांचे आपण मारेकरी होऊन जगायचे कि ऐक्याचे शिलेदार म्हणून जगायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा