अकलूज ---प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १९ वा युवा महोत्सव स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर या ठिकाणी नुकताच संपन्न झाला. या युवा महोत्सवामध्ये शंकरराव मोहिते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला.त्यानिमीत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते युवा महोत्सवातील कलाकारांचा व त्यांच्या माता-पिता,मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान ट्रॉफी,शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. हा सोहळा स्मृती भवन अकलूज येथे संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्यामध्ये अंगी असणाऱ्या कलागुणांना देखील विकसित करावा.कारण कलाच माणसाला जगायला शिकवते.अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी युवा महोत्सवातील निवडक कला प्रकारांचे सादरीकरण देखील यावेळी स्मृती भवन अकलूज या ठिकाणी करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी अकलूज पंचक्रोशीतील ग्रामस्थ कलाकारांचे माता-पिता व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नारायण फुले,रामभाऊ गायकवाड,सुभाष दळवी,वसंतराव जाधव, बाळासाहेब सणस,सौ.निशा गिरमे,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे,स्थानिक प्रशालेचे मुख्याध्यापक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा