Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

सदाशिवराव माने विद्यालयातील ३८० विद्यार्थ्यांनी बनवली वैज्ञानिक उपकरणे

 



अकलूज ---प्रतिनिधी

 शकुर तांबोळी

टाइम्स 45 न्युज मराठी.

                          शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे ३८० विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.



         रामलिंग सावळजकर,गिरीश ढोक व श्रीकांत राजमाने यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न झाले.मुख्याध्यापक अमोल फुले यांनी प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना विविध संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन दिले.डॉ. सावळजकर,प्रा.ढोक व राजमाने यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात,विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करावा व नागरिकांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी.यावेळी अकरावी मधील सुरज मोरे या विद्यार्थ्यांने मनोगत व्यक्त केले.



          या प्रदर्शनामध्ये आरोग्य,कचरा व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण, गणितीय प्रतिकृती व कृषी क्षेत्रावर आधारित विविध उपकरणे तयार केली होती.

       यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले,उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे,उपप्राचार्य संजय शिंदे व विनायक रणवरे, पर्यवेक्षक राजन चिंचकर,उमेश बोरावके उपस्थित होते.

   विज्ञान विभाग प्रमुख दिपाली लोखंडे व भक्ती तावरे आणि सर्व विज्ञान विषय शिक्षक यांनी हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यास्मिन शेख यांनी केले तर संजय शिंदे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा