अकलुज ---प्रतिनिधी
लक्ष्मीकांत कुरुडकर
टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सदाशिवराव माने विद्यालयात दि. २३/१०/२०२३ रोजी विज्ञान प्रदर्शन सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी प्रा. रामलिंग सावळजकर, श्री. राजमाने सर व श्री. ढोक सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. अमोल फुले सर यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांना उद्बोधित केले. प्रदर्शनात प्रा. सावळजकर व इतर परीक्षक यांनी वैज्ञानिक प्रकल्प पाहत शास्त्रज्ञ, विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रदर्शनामध्ये इ.६ वी पासून इ.१२ वी पर्यंत सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सौ. शेख मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री. एस.पी.शिंदे सर यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा