अकलुज ---प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथील लोहार गल्लीतील शिवशक्ती नवरात्र महोत्सव मंडळाची नुकतीच मिटींग संपन्न झाली.सन २०२३-२४ साठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यामध्ये अध्यक्षपदी समीर माने,उपाध्यक्षपदी मन्मथ पालखे,खजिनदारपदी अभिषेक चाबुकस्वार,सचिवपदी अमर सोनके,कार्याध्यक्षपदी विनायक माने,यांची निवड करण्यात आली आहे.
या मंडळाची स्थापना १३/१०/१९७७ साली झाली असून आजवर या मंडाळाने सामाजिक उपक्रम राबविले आहेत.त्यामध्ये अन्नदान,शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप,वह्यांचे वाटप,आषाढी वारीतील वारकऱ्यांची सेवा म्हणून चहा व अल्पोपहारचे दिला जातो,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ असे अनेक सामाजिक कार्य करून सांस्कृतिक उपक्रमात देशभक्तीपर नाट्य,पथनाट्य, तरूण पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून व्याख्याने,किल्ले, चित्रकला,बुद्धीबळ स्पर्धा अनेक विविध कार्यक्रम हे मंडळ दर वर्षी राबवित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा