गणेशगांव (नूरजहाँ शेख)
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने सोलापूर जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेचे आयोजन गणेश हॉल येथे करण्यात आले.या स्पर्धेचा शानदार उद्घाटन महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगरसेविका शारदाताई नामदेव पाटील,सत्तेन जाधव (तालुका क्रीडा अधिकारी),मोहन यादव (कुस्ती क्रीडा मार्गदर्शक), ओमप्रकाश पवार (जे एफ आय नॅशनल रेफरी),प्राचार्य पांडुरंग बनसोडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संतोष पवार इंदापूर असोसिएशन सचिव,प्रगतशील बागायदार नामदेव पाटील,महादेव ताकतोडे कराटे प्रशिक्षक,श्रीकांत चौधरी कोच,अजित बनकर क्रीडाशिक्षक वेळापूर,पर्यवेक्षक नवनाथ अधटराव,प्रा.सुनील गवळी, सिताराम गुरव,समन्वयक प्रा.सुधाकर कांबळे, क्रीडा शिक्षक विजयकुमार केचे,शामराव धाराव,महिला क्रीडा शिक्षिका करुणा धाइंजे,हनुमंत मोरे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय दोरगे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे,सचिव बाळासाहेब भोसले,आदी मान्यवरांच्या शुभहस्ते ज्यूदो मॅटचे पूजन करून करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. प्रथम खेळाडूंची नोंदणी करून, वजनाप्रमाणे गट पाडून व लॉट्स पाडून परीक्षकांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्यूदो स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
सदर शालेय ज्यूदो क्रीडा स्पर्धा सन २०२३-२४ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत,जिल्हास्तर शालेय,जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर,सोलापूर जिल्हा ज्यूदो असोसिएशन व श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय श्रीपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीपूर येथे खेळल्या जात आहेत. सदर स्पर्धा दोन दिवस चालणार असून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील ज्यूदो स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती सावंत मॅडम यांनी केले तर आभार सिताराम गुरव सर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा