*
गणेशगांव प्रतिनिधी
नुरजहाँ शेख.
प्रशासन झाले सुस्त...नेते राजकारण खेळण्यात व्यस्त...तर...पुर्व भागातील शेतकरी वर्ग मात्र शेतीच्या पाण्यासाठी झाला आहे त्रस्त...अशी अवस्था माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील निरा नदीच्या काठावरील बळीराजाची झाली आहे.गणेशगांव (ता.माळशिरस) या गावातील निरा नदीवर खूप वर्षांपूर्वी बंधारा बांधला आहे.सध्या या बंधा-यातील लोखंडी दरवाज्यांना गंजून मोठ मोठी छिद्रे पडली असल्यामुळे त्यातून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहून जात असल्यामुळे त्या बंधा-यात साठणारे पाणी पुढे नदीत वाहत जात आसल्याने बळीराजाच्या जीवाची तळमळ होत आहे.त्यामुळे नदी उशाला अन् कोरड शेतकऱ्यांच्या जमिनीला अशी आवस्था झाली आहे.
पाणी आडवा....पाणी जिरवा हा शासनाचा अभिनव संकल्पना व उपक्रम आहे .पण पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ठिसाळ कारभारामुळे हि संकल्पना मोडीत निघत आहे.गणेशगांवच्या
बंधा-यातील पाणी गंजलेल्या दारांच्या छिद्रातून मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे हे पाहून शेतकऱ्याचा जिवाची तळतळ होत आहे.सर्व सामान्य ग्रामीण व्यक्ती ही प्रशासकीय अधिकाऱ्याचा व आपल्या लाडक्या नेत्यांचा मोबाईल नंबर मिळवून पोटतिडकीने विनवणी करीत आहे आमचे हक्काचे पाणी वाचवा आमचे जीवन वाचवा परंतु या शेतकऱ्याच्या नेते आणि शासकीय अधिकारी प्रतिसाद देत नसल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर निघत आहे.शासकीय अधिकारी हा बंधारा बघायला येत नाही .
सोलापूर जिल्ह्यात यावर्षी पावसाने ऐन पावसाळ्यात तीन महिने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग आधीच चिंताग्रस्त झाला आहे.त्याच बरोबर राज्यात यंदा पावसाने अत्यल्प हजेरी लावलेली आहे बोअर,विहिरींचे पाणी उन्हाळ्यात आटण्याची दाट शक्यता आहे नदीचे पाणी चांगल्या पद्धतीने अडवणूक केली तर शेतकरी चांगले जीवन जगू शकेल अन्यथा त्यांचे जीवन उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.
पाणी वाचवा आमचे जीवन वाचवा अशी पोटतिडकीने विनवणी करणारा शेतकरी आता तीव्र संताप व्यक्त करीत आहे . इरीगेशन खात्याकडे आणि जनतेच्या प्रश्नांनांकडे पाठ फिरवणाऱ्या नेत्यांकडे विनवण्या करून बळीराजा थकला आहे. आमच्या ओंजळीतील निसटून चाललेले हक्काचे पाणी आंम्हास मिळवून द्या अन्यथा नदीकाठची सर्व गावे एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार करू व आंदोलन करण्यास आम्हास भाग पडू नका आशी संत्तप्त प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत.एकही प्रशासकीय अधिकारी किंवा नेता शाहनिशा करण्याकरीता नदीवर आला नाही संकटसमयी जर तुम्ही आमचा टाहो ऐकणार नसाल तर हात जोडून आमच्याकडे मत मागण्यासाठी याल तेव्हा आम्ही ही अशीच पाठ फिरवू असे विनवण्या करून थकलेला शेतकरी बोलताना दिसत आहे.एक तर पिकांना योग्य भाव मिळत नाही आसमानी संकटातून शेतकरी उबदारी येईना त्यातून निष्क्रिय प्रशासन साथ देईना जगावे कसे शेतकऱ्याने हा सवाल खचलेला शेतकरी वर्ग खुर्ची सम्राटांना करीत आहे.पाणी वाचवा..जीवन वाचवा हा सरकारचा संदेश आता बळी चाललेला बळीराजा प्रशासनाला हलवून जागे करण्यासाठी उच्चरीत आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाची ही अवस्था देशासाठी लाजिरवाणी होत नाही का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा