संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुनील कावळे यांच्या पार्थिवावर आज छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील कावळे यांनाा अखेरचा निरोप देताना उपस्थित असलेल्या सर्वांना अश्रू अनावर झाले होते. सुनील कावळे यांना आंदोलकांकडून आदरांजली अर्पण करत 'अमर रहे' च्या घोषणा देण्यात येत आल्या. तर अंत्यविधीच्या ठिकाणी राजकीय नेत्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीय.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत एका 45 वर्षीय सुनील कावळे यांनी भर रस्त्यावर गळफास घेत आत्महत्या केली. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पुलाच्या खांबाला गळफास घेत त्याने आपलं जीवन संपवलं. जालन्यातल्या मराठा आंदोलनात सुनील कावळे हा व्यक्ती सक्रिय होता अशी माहिती आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलीय गळफास घेण्याआधी सुनील कावळे मृत्यूपूर्व चिठ्ठी देखील लिहिली होती. कावळे यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. या वेळी अंत्यदर्शनला मराठा समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केले. सुनील कावळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो स्मशानभूमीत पोहचले होते.
सुनील कावळे यांच्या आत्महत्येनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सुनील कावळे यांच्या अंत्यदर्शनासाठी स्मशानभूमी समोर आलेले भाजप आमदार हरिभाऊ नाना बागडे यांना प्रवेश नाकारला. बागडे यांनी स्मशानभूमी बाहेरूनच काढता पाय घेतला. सत्ताधारी आणि विरोधक मराठा आमदारांविरोधी आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
"सुनिल कावळे कोण होते "
सुनील कावळे यांची परिस्थिती हालाखिची होती. त्यांच्याकडे एक एकरपेक्षाही कमी शेती आहे, जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील चिकनगाव हे सुनील कावळे यांचं मूळगाव. गावाकडे कमी शेती, त्यात उदरनिर्वाहाचा प्रश्न, त्यामुळे सुनील कावळे हे जालन्यावरुन छ. संभाजीनगरला आले. त्यांनी सुरुवातीला ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. मुंबई-पुणे या मार्गावर त्यांनी अनेकवेळा ड्रायव्हिंग केलं. गेल्या 15 ते 17 वर्षापासून ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. मात्र मराठा आरक्षण आंदोलनाकडे त्यांचा कल होता. नोकरीमुळे सभेला हजर राहता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी नोकरीही सोडली. मराठ्यांना आरक्षण नाही, एक एकरात शेती क्षेत्रात काही होत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही असं सुनील कावळे म्हणायचे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा