Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३

जी सी सी-- टी बी सी ,संगणकीय टायपिंग मॅन्युअल टायपिंग व लघुलेखन प्रवेश सुरू. अनाधिकृत प्रवेश देणाऱ्या संस्थांवर गुन्हे दाखल करणार डॉ, नंदकुमार बेडसे

 


विशेष ----प्रतिनिधी राजु (कासिम) मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

                         महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशी सलग्न असलेल्या जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल २०२४ साठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली. हे प्रवेश दि.०१/१०/२०२३ पासून सुरू झालेले आहेत. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या https://www.mscepune.in/gcc/CT_INST_MUMBAI.aspx या लिंकवर आपल्या जिल्हयातील तालुक्यातील गावातील, शहरातील जवळच्या मान्यताप्राप्त टायपिंग संस्थांची यादी तपासून पहावी. त्यानंतर त्या संस्थेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या ई-प्रमाणपत्रावरील त्याच संस्थेचे नाव व पत्ता बरोबर आहे का? याची खातरजमा करूनच प्रवेश घ्यायचा आहे. अन्य नियमबाह्य संस्थांमधून संगणकीय टायपिंगसाठी प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी आपली फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थी व पालकांना केले आहे.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे राज्यभरात जीसीसी टीबीसी संगणकीय टायपिंग परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतल्या जातात. यामध्ये मराठी ३० व ४०, हिंदी ३० व ४० व इंग्रजी ३०,४० व ५० शब्द प्रति मिनिट गतीच्या परीक्षा असतात. प्रत्येक विषयासाठी सहा महिन्यांचा हा कोर्स असून याची प्रती विषय रु.६५००/- इतकी फी आकारली जाते. एकाहून अधिक विषय घेतल्यास रूपये ६५००/- प्रती विषय अशी फी आकारण्यात येते.


त्याचबरोबर लघुलेखन (Shorthand) परीक्षा देखील परिषदेमार्फत घेतल्या जातात. त्यामध्ये मराठी, हिंदी व इंग्रजीच्या ६०,८०,१०० व १२० अशा शब्द गतीच्या परीक्षा असतात. त्यांचेही प्रवेश आता सुरु झालेले आहेत. तर मशीनवरील टायपिंगमध्ये मराठी व हिंदी ३० व ४० तर इंग्रजीमध्ये ३०.४०, ५० व ६० अशा शब्दगतीच्या परीक्षा घेतल्या जातात, अशी माहिती त्यांनी दिली.


मागील परीक्षेपासून आम्ही जीसीसी टीबीसी परीक्षा अर्ज भरताना काही नवीन सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार अनधिकृत प्रवेशांना आळा घालण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आता संस्थेमध्ये कोर्सला प्रवेश घेतानाच परीक्षेचा प्राथमिक अर्ज ऑनलाइन भरून घेतला जाईल. त्यामुळे नंतर ऐनवेळी परीक्षा अर्ज भरून घेणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे या गैरप्रकारांना आपोआपच आळा बसेल असे अध्यक्षांनी सांगितले.


आमची संस्था मान्यताप्राप्त असून आमच्याकडे प्रवेश घ्या व निश्चिंत राहा, आमच्याकडे पण शासनाची परवानगी आहे, अशा प्रकारची खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन अनेक विद्यार्थ्यांना फसविण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर पास करून देण्याची हमीही काही संस्थाचालक देतात व अधिक पैसे घेऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात. या दृष्टचक्रात विद्यार्थ्यांनी व पालकांनी पडू नये, खोटया अमिशांच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन यावेळी डॉ.

बेडसे यांनी केले.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यावर्षीपासून प्रत्येक जिल्हयातील प्रत्येक विषयातील सर्वाधिक गुण मिळविलेल्या पाच विद्यार्थ्यांची नावे जाहीर करून त्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार अलिकडेच ती यादी जाहीर करण्यात आलेली आहे. हे नमुद करीत डॉ. बेडसे यांनी भविष्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जीसीसी टीबीसी संगणकीय टायपिंग व लघुलेखन या विषयांमध्ये सकारात्मक बदल करण्याचा मानस जाहीर केला. शिवाय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आता अनधिकृत संस्था व विद्यार्थी बसविणाऱ्यांवर कडक नजर ठेवून आहे व हे आता दिसून

येईलच. त्यामुळे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य कामे करू नये, नियमबाह्य संस्थांचे विद्यार्थी परीक्षेसाठी घेऊ नयेत व तसे दिसून आल्यास कडक कार्यवाहीसाठी तयार राहावे, असा सूचक इशाराही संस्थाचालकांना दिलेला आहे. त्यानंतरही कोणी अशा प्रकारे अनधिकृत व नियमबाह्य काम करताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून मान्यता रद्द करण्यात येईल असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा