संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
शिवतिर्थावर शिवसैनिकांची त्सुनामी लाट पसरली पाहिजे.मागच्या वर्षीही निष्ठेने शिवसैनिक दादरला शिवतिर्थावर आले होते या वर्षीही तमाम शिवसैनिकांनी बाकीची काम बाजूला ठेवून शिवसेनेवरील निष्ठा दाखवून द्यायची वेळ आहे.उद्धवसाहेबांचे जाज्वल ज्वलंत विचार एैकण्यासाठी एकनिष्ठेचा झरा वाहणार आहे.जीवनात काही मिळाल नाही तरी चालेल पण निष्ठावांत शिवसैनिक म्हणून जी आपली ओळख आहे ती कायम राहिली पाहिजे.दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांचा एक प्रकारे आनंदाचा सण असतो विचारांच सोन लुटायचा हा सुवर्ण दिन म्हणून ओळखला जातो.
काल परवा एका गद्दाराच वाक्य मी ऐकल की आमचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा होणार आहे मागच्या वर्षीचा उच्चांक आम्हीच मोडणार आहोत वैगेरे..त्या गद्दाराला आम्हास सांगायचे आहे अरे गद्दारा तु काय गर्दी करणार ? ५००-५००,१००० रूपये देऊन माणस जमावणारा तु गद्दार ! तु काय गर्दी जमाविणार ? बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत गोड बोलून विश्वासघाताने खंजीर खूपसणाऱ्याने गर्दीच्या बाता मारू नये.तुमची लायकी महाराष्ट्रातील जनतेने ओळखलेली आहे तुमच्यात दम असेल तर निवडणुका लावून दाखवा.
राहूल नार्वेकर सारखा एक भाजपचा दलाल विधानसभेत अध्यक्ष आहे.सुप्रीम कोर्टालासुद्धा याने फाट्यावर मारले आहे.कायदा हा भाजपच्या लोकांना लागू होत नाही का ? हा रोज सुप्रीम कोर्टाचा अपमान करतो या हिंदूस्तानला ही फालतू लोकशाही एक दिवस तालीबान बनविल्याशिवाय राहणार नाही.लोकशाहीची चेष्टा लावली आहे या लोकांनी लोकशाहीच्या चिंधड्या चिंधड्या उडविल्या जात आहेत.कायदा व सुव्यवस्थेची एैशी की तैशी केली जात आहे केवळ शिवसेनेशिवाय कोणता माईचा लाल याच्यावर आवाज उठवित नाही.
स्वत:च्या स्वखर्चाने चटणी भाकरी बांधून शिवसैनिक शिवतिर्थावर येणार आहेत.त्या ४० हरामखोर आमदार व १२ बापाच्या १३ गद्दार खासदारांना धुळीस मिळवायचे आहे त्यासाठी शिवसैनिकांनी आपली ताकद दाखवायची आहे.गद्दारी करून भाजपबरोबर जावून ज्यांनी बाप बदलला त्या बापबदलू लोकांना हा शिवसैनिक पुरून उरणार आहे.किती दिवस हे भाजपच्या जीवावर जगणार आहेत ? एक दिवस त्यांची राजकीय तिरडी ही निघणार आहे फक्त आजच मरण हे उद्यावर ढकलत आहेत.गद्दार अगोदर म्हणत होते तुम्ही राष्ट्रवादीला जवळ केल म्हणून आम्ही लांब गेलो मग अजित पवार तुमचे जावई आहेत का? तुमचे बाप आहेत जे आता तुमच्यासोबत आले म्हणून तुम्हाला चालत आहेत हे एकदा जनतेला सांगा.तुमची ही लफंगेगिरी जास्त काळ टिकणार नाही.
किती आले किती गेले शिवसेनेला फरक पडला नाही ना पडणारही नाही.४० गेले १४० आमदार निर्माण करण्याची ताकद शिवसेने मध्ये आहे.दिल्लीच्या तख्ताला हलवून टाकायची धमक शिवसैनिकांमधे आहे हे ४० तर पालापाचोळा आहेत फक्त निवडणुकीच्या एका निकालात या पालापाचोळ्यांना जाळून खाक करून टाकू.
जय महाराष्ट्र
अतुल श्रावण भवर,सोलापूर.
मो नं ९९६००९०००१.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा