संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
भाजपा प्रणीत भारत सरकारने नोकरीच्या बाबतीत व इतर औद्योगिक विकास क्षेत्रात खाजगी करण करून आरक्षण मोडीत काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालवला आहे या घटनेमुळे तमाम दलितांच्या हक्कावर अतिक्रमण होत आहे.या घटण्याच्या निषेधार्थ दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.मच्छिंद्र सकटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.राजाभाऊ खिलारे,युवासेनेचे शेखरभैया खिलारे, पपुभाऊ मिसाळ ,यांच्या उपस्थिती संपत खिलारे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय माळशिरस जिल्हा सोलापूर येथे बोंबाबोंब (शंकनाद)आंदोलन घेण्यात आले.
त्यावेळी उपस्थितीत कार्यकर्ते दलित महासंघाचे मोहम्मद मुलानी दादा खिलारे, रामचंद्र खिलारे, रंजीत जगदाळे, हेमंत खिलारे, शाखाध्यक्ष सोमनाथ खिलारे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब रणदिवे, दलित महासंघाच्या महिला आघाडी प्रमुख दिपाली पवार ,द्रोपदी खिलारे ,शाखा अध्यक्ष सुनीता खिलारे ,अश्विनी रणदिवे ,रेश्मा खिलारे ,रनिंग खिलारे, युवा नेतृत्व सोनाली ताई खिलारे ,प्रणिती खिलारे, बायडाबाई खिलारे,महेश खिलारे ,अनिल खिलारे ,धनाने इत्यादी उपस्थित होते. सदर आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार सौ.कुलकर्णी मँडम यांनी स्विकारले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा