श्रीपूर -ज्येष्ठ पञकार
बी.टी.शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे त्यांची तब्येत ढासळत चालली आहे त्यांच्या तब्येतीची काळजी संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिली आहे आरक्षण देणार शासन ठाम सांगत आहे मात्र देण्यास विलंब करत आहे जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी भेट देऊन आरक्षणाचा मुद्दा व ते कसे दिले जाईल त्यासाठी नेमकी अडचण काय आहे न्यायालयात आम्ही काय बाजू रहाणार आहे त्यासाठी किती वेळ लागेल हे जरांगे पाटील यांना विनंती करुन सांगितले पाहिजे नंतर उशीर करून वेळ घालवून तेथे जाण्याला अर्थ रहाणार नाही जरांगेपाटील यांचा जीव महत्वाचा आहे त्यांच्या जिविताशी खेळू नका शासनाची जी भुमिका व त्यांनी आरक्षणाची भुमिका लेखी दिली तर जरांगेपाटील यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करावा राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला आहे सामाजिक राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील शासनाने जराही विलंब न करता अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांना शासनाची भुमिका लेखी देऊन उपोषण थांबवण्याची मनधरणी केली तर जरांगेपाटील विचार करतील ही अपेक्षा आहे त्यांच्या तब्येतीशी खेळू नये जरांगेपाटील पाटील हे सत्यवादी आहेत ते आरक्षणावर ठाम आहेत त्यांनी आपले प्राण पणाला लावले आहेत शासनाने विलंब केल्यास महाराष्ट्राला त्याची किंमत चुकवावी लागेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा