अकलुज ----प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 46 न्युज मराठी.
कला,क्रीडा व सांस्कृतिक विभागात आवड असणारे जयसिंह मोहिते-पाटील यांनी अनेक खेळाडू व कलाकारांना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.यामधून बरेच उदयमुख कलाकार असो अथवा क्रिडापटू चांगली कामगिरी करून नावारूपाला आले आहेत.काल अकलाई देवीच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या गरबा नृत्य व दांडिया नृत्य कार्यक्रमात स्वतः बाळदादा यांनी गरबा नृत्यात भाग घेऊन आनंद घेत होते.हा बाळदादांचा आनंद बघून वयोवृद्ध आजींना नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही.त्या आजीनी बाळदादांबरोबर नृत्य करून नृत्याचा मनमुराद आनंद उपभोगला.शेवटी एकच म्हणावे वाटते की कलेला वयाचे बंधन नसते....(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा