अकलूज ---प्रतिनिधी
शकुर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत विद्यार्थिनींनी 'भोंडला' हा पारंपारिक खेळ मोठ्या उत्साहात शनिवार दिनांक 21 ऑक्टोंबर 2023 रोजी साजरा केला. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा भोंडला हा पारंपारिक खेळ खेळला जातो.यावेळी शेतात पिके चांगली असतात लक्ष्मी असते आणि गजांत लक्ष्मीचे स्वरूप म्हणूनच हत्तीची पूजा केली जाते.
प्रशालेमध्ये मैदानाच्या मध्यभागी हत्तीची मूर्ती मांडून त्याची पूजा यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा सरतापे ,तसेच प्रशाला समिती सदस्य कांबळे मॅडम ,अभंग मॅडम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड,ज्येष्ठ शिक्षक अनिल पिसे, नामदेव कुंभार व सर्व महिला शिक्षिका यांनी केले.
मुलींनी हत्तीभोवती पारंपारिक गाणी म्हणत फेर धरला व विविध पारंपारिक खेळांचा आस्वाद घेतला. यानंतर मुलींनी आणलेल्या खिरापतीच्या ओळखण्याचा मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आला व खिरापत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी वंदना काळे, माधुरी चव्हाण, नीलम देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारती चंदनकर यांनी केले. सूत्रसंचालन रचना रणनवरे,वृषाली थोरात यांनी केले. तर आभार धन्यता साखरे यांनी मांडले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा