संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
तुळजापूर तालुका दुष्काळ जाहीर न केल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध व तुळजापूर तालुका पुनर यादीमध्ये दुष्काळ जाहीर करणे बाबत तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून तालुक्याचे लोकप्रिय आमदार म्हणून मिरवणारे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा देणेबाबत
अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबत
वरील विषयास अनुसरून निवेदन देण्यात येते की महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात 90 टक्के तालुका दुष्काळ म्हणून जाहीर केले आहे परंतु तुळजापूर तालुका हा कुसळी गवताचा व डोंगराळ भाग असून अत्यंत पाऊस कमी झाल्यामुळे तालुक्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये काही गावांमध्ये टँकर चालू आहेत सर्वसामान्य शेतकरी मजूर कामगार यांचा रोजी रोटीचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे.
तुळजापूर तालुका हा संपूर्ण पावसावर अवलंबून असून यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे हे विद्यमान आमदार यांना माहिती असूनही त्यांनी जाणीवपू पूर्णपणे दुर्लक्ष करून एक प्रकारे तुळजापूर तालुक्यावर अन्याय केला असून महाराष्ट्र शासनाचा व आमदारचा जाहीर निषेध करीत आहोत वास्तविक पाहता तालुक्याच्या आमदारांनी शासनाकडे मागणी करून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करायला हवे होते मात्र तुळजापूर तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून यादीमध्ये जाहीर न केल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यात यावा.
तरी राज्यपाल महोदयांना विनंती आहे की तुळजापूर तालुका दुष्काळ जाहीर करणे संदर्भात महाराष्ट्र शासनाला आदेश देण्यात यावे अशी विनंती निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व धाराशिवीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून याप्रसंगी सर्व पक्षातील प्रमुख पदाधिकारी धीरज कदम पाटील. श्याम पवार. अजय साळुंखे. प्रशांत कदम सुंजी. मोरे हरिश्चंद्र. माणिकराव कुमार टोले. सुधीर कदम. कापसे धैर्यशील. जीवनराजे इंगळे. चिन्मय मगर. सुनील जाधव .राहुल विनोदराव खपले. नवनाथ जगताप .धैर्यशील पाटील. महेश गवळी. शहाजी नन्नवरे.तौफिक शेख. गणेश नन्नवरे. शरद जगदाळे .संदीप गंगणे . निलेश नंदकुमार मगर. समाधान डोंगरे. बालाजी जाधव. निखिल अमृतराव. इत्यादी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा