संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
कोळी समाजातील जाती जमाती उपजाती यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे आणि
महाराष्ट्र राज्यातील अन्यायग्रस्त आदिवासी कोळी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रधान सचिव आदिवासी विभाग मंत्रालय मुंबई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
उपरोक्त विषयासंदर्भात शरद कोळी, शिवसेना उपनेते व शरदभाऊ तायडे, जळगाव यांचे प्राप्त झालेले निवेदन सोबत जोडले आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पौराणिक काळापासून कोळी समाज वास्तव्य करीत आहेत. कोळी ही एक आदिवासी जमात असुन ती संपुर्ण राज्यात वास्तव्यास आहे. शासन स्तरावर आदिवासी क्षेत्रातील राहिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील राहिवासी असा फरक केला जात आहे. कोळी समाज अनुसूचित जमाती (ST) व इतर मागास वर्ग / विशेष मागास प्रवर्ग या दोन प्रवर्गामध्ये विभागला गेलेला आहे. या आदिवासी जमातीमध्ये टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार कोळी ढोर, डोंगर कोळी या उप जमातीचा समावेश केला जातो.
या सर्व जाती-जमाती, उप जाती यांचा समावेश १९५० पूर्वीच्या शासन दरबारी असलेल्या शाळेतील व जन्म दाखल्यावरील तसेच महसुल नोंदी ह्या जणगणना नियमानुसार कोळी म्हणुन घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आदिवासी क्षेत्रातील (TSP) व बिगर आदिवासी क्षेत्रातील (OTSP) प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर डोंगर कोळी या उप जमातीचा शासन स्तरावर उल्लेख कोळी म्हणुनच करण्यात आल्याने सदर जमातीला अनुसुचित जमातीच्या प्रवर्गातील सवलतींचा फायदा होत नाही. तसेच त्यांना जातीचे दाखले व जात पडताळणी दाखले मिळवितांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तरी
उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता नमुद केलेल्या कोळी समाजातील जाती-जमाती, उपजाती यांना अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करावे. असेही निवेदनात म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा