आनंदाचा शिधा,- देणार कधी? दिवाळी झाल्यावर का? दिवाळीच्या आधी!
संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महायुतीचे सरकार स्थपन झाल्यानंतर त्यांनी गोरगरिबांना सण आनंदाने साजरा करता यावा या उद्देशाने गौरी गणपती असो किंवा दिवाळी असो अशा विविध सणांना गोरगरिबांसाठी 100 रुपयामध्ये 4 वस्तु खाद्यतेल ,साखर ,रवा, हरभरा डाळ, हे आनंदाचा शिधा मध्ये दिला जातो माञ दिवाळी साठी शासनाकडून 100 रुपया मध्ये 6 वस्तु देण्याची घोषणा केली आहे माञ दिवाळी 4 दिवसावर येऊन ठेपली आहे परंतु अद्याप " आनंदाचा शिदा " आणि चालु नोव्हेंबर महिन्याचे शिधापत्रिकेवरील धान्य स्वस्त धान्य दुकानदाराकडे आलेली दिसत नाही त्यामुळे शासन दिवाळी झाल्यानंतर गोरगरिबांना मासिक धान्य व आनंदाचा शिदा, देणार का? असे गोरगरीब शिधापत्रिका धारकातून बोलले जात आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यात आनंदाचा शिधा वितरीत होत आहे मात्र सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात कुठे घोडे नडले हेच कळत नाही.
विशेषतः वारंवार स्वस्त धान्य दुकानदारांकडून अनेक चुका होत असून शिधा पत्रिका धारकांना वेळेवर धान्य न देणे शिवाय धान्य केव्हा वाटप करतात हे सुद्धा शिधापत्रिकाधारकांना कळत नाही त्यानंतर शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य दुकानदाराकडे धान्याची मागणी केली तर माल संपला आहे तुम्हीच लवकर आला नाही असे उडवा उडवी चे उत्तरे दिले जातात अशा अनेक कारणे सांगून संपूर्ण महिन्याचा शिधापत्रिकेवरील धान्य हडपला जातो की काय? अशी शंका निर्माण होत आहे तसेच काही वेळा तर भोळ्या भाबड्या शिधापत्रिकाधारकांना सांगितले जाते की एक-दोन दिवसात धान्य येणार आहे ,तुम्ही( बायोमेट्रिक) अंगठा देऊन जावा धान्य आले की प्रथम धान्य तुम्हाला दिले जाईल ,असे सांगून अंगठा घेतला जातो अंगठा घेतल्यानंतर धान्य आज येईल उद्या येईल अशी आश्वासने देत तो महिना संपून जातो त्यानंतर दुसऱ्या महिन्यात आलेले धान्य त्या शिधापत्रिकेधारकांना दिले जाते
आणि पाठीमागील महिन्याचे धान्य कोठे जाते हे समजत नाही अशी चर्चा हल्ली सर्वत्र होत आहे शिवाय शिधापत्रिकेवरील धान्य घेऊन जाणारे हे मोलमजुरी करणारे गोरगरीब असतात आणि मोलमजुरी केल्यामुळे त्यांच्या हाताची बोटे त्या बायोमेट्रिक यंत्रामधील ठशाशी मॅच होत नसल्याने काही शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून मुकावे लागत आहे तरी शासनाने या बायोमेट्रिक यंत्रणेत आधुनिक पद्धतीने बदल करून ज्याच्या त्याच्या हक्काचे धान्य त्यालाच मिळाले पाहिजे अशी व्यवस्था करावी असेही शिधापत्रिका धारकातून बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा