टाइम्स 45 न्युज मराठी.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2023-24 मध्ये उत्पादित झालेल्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक(मालक), यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी उपस्थीत होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक(मालक) यांनी माहिती दिली की, कारखान्याचा गळीत हंगाम 2023-24 हा सुरळीत सुरु झाला आहे. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासत आला आहे. गळीत हंगाम 2023-24 मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसास चांगला दर दिला जाणार असून कारखान्याच्या व्यवस्थापनाने चालू गळीत हंगाम 2023-24 मध्ये विस्तारीकरण केले असून प्रतीदिन 8500 ते 9000 मे.टनाप्रमाणे ऊस गाळप करणार आहोत. त्यामुळे ऊस उत्पादकांना चालू हंगामात ऊस तोडणी लवकर मिळणार आहे. या हंगामात कारखान्याचे 10 लाख मे.टन ऊस गाळपाचे उदीष्ट असून ते पुर्ण करणार आहोत. कारखान्याचा को-जन प्रकल्पही वाढीव क्षमतेने चालणार असून आसवनी प्रकल्प 90,000 बल्क लिटर क्षमतेने चालविणार आहोत. कारखान्याचे विस्तारीकरणाचे काम व्यवस्थित झाले असून सर्व मशिनरी सुरळीत चालू झाली आहे.
त्यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की कारखान्याच्या ऑफ-सिझनमध्ये कारखान्याचे विस्तारीकरण केले असून कारखाना पहिल्या दिवसापासून विना अडथळा सुरु झाला आहे. गाळप क्षमतेच्या प्रमाणात ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेची उभारणी केली आहे. हा हंगाम कमी दिवसाचा असला तरीही कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ झालेने अपेक्षीत गाळप मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक(मालक) आणि कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.कैलास खुळे, संचालक मंडळ व अधिकारी यांच्या सहकार्याने पुर्ण करणार आहोत.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. दिनकरराव मोरे, श्री.वसंतराव देशमुख, श्री. उमेशराव परिचारक, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री. ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री. बाळासो यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री.लक्ष्मण धनवडे, श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.हणमंत कदम श्री.सुदाम मोरे श्री.विजय जाधव, श्री.किसन सरवदे, श्री.शामराव साळुंखे, श्री.सिताराम शिंदे, श्री.राणू पाटील, तज्ञ संचालक श्री.दाजी पाटील, श्री.दिलीप गुरव कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा