Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

चाकोरे ता. माळशिरस येथे धनगर समाज प्रबोधन रॅलीचे मराठा समाज बांधवांकडून भव्य स्वागत


 

अकलुज --प्रतिनिधी

केदार लोहकरे.

टाइम्स 45न्युज मराठी

                          माळशिरस तालुक्यात आज धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज आरक्षण प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीचा शुभारंभ माळशिरस येथून झाला आहे.त्यामध्ये अनेक चार चाकी, मोटारसायकल सहभागी झाल्या होत्या.

             चाकोरे या गावात रॅलीचे आगमन झाले तेव्हा सकल मराठा समाज व धनगर समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मराठा व धनगर समाज बांधव आरक्षणापासून वंचित आहेत धनगर समाज आरक्षणसाठी काढलेल्या रॅलीला प्रतिसाद देत चाकोरे येथे सर्व बांधवांचे मराठा समाजाकडून स्वागत करण्यात आले.यावेळी हनुमंतराव शिंदे,गणपत (तात्या) वाघमोडे, मारुती पाटील,टि.डी. वाघमोडे,प्रताप लवटे,सोमनाथ शिंगटे,सागर वरकड,महादेव शिंगटे,वैभव रसाळ,किशोर सुळ,पांडुरंग वाघमोडे,अजित बोरकर,मोहन जाधव,बबन शिंदे,ज्ञानदेव नलवडे,किरण वाघमोडे,विष्णू कोळेकर,शामराव बंडगर,आबा कोळेकर,सुरेश पाटील,दत्ता कदम,तानाजी पाटील,नवनाथ जाधव,चैतन्य कोळेकर,सचिन कचरे,अभय सुसलादे,बंडु माने, इत्यादी धनगर व मराठा बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

          धनगर समाज आरक्षण प्रबोधन रॅली माळशिरस येथून निघून वटफळी,अकलूज, कोंडबावी,चाकोरे, कचरेवाडी, तिरवंडी,मेडद,उंबरे (स), मारकडवाडी,फोंडशिरस, पळसमंडळ,बांगर्डे, पिरळे, एकशिव,कुरभावी,डोंबाळवाडी, मोरोची,नातेपुते मार्गे मांडवे येथे समाप्त होणार आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा