Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि जेऊर येथे" हुतात्मा एक्सप्रेस" ला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न--- धैर्यशील मोहिते पाटील.

 


विशेष प्रतिनिधी---राजु(कासिम)मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी.

                          माढा व करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्थानकावर सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळविण्यासाठी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी पत्र लिहून प्रवासी थांबण्याची मागणी केली आहे.



सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लोकांना सोयीचे असलेल्या जेऊर व माढा रेल्वे स्टेशनवर नेहमी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.पुण्याला दररोज शाळा काॅलेजचे विद्यर्थी,नोकरदार वर्ग,हाॅस्पीटल्स करीता ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.  

या रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोईकरता हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा आवश्यक आहे.



सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाल्यास या शहरातील नागरिकांना मोठा फायदा होईल तसेच शिक्षण व्यवसायांच्या दृष्टीने या शहरांच्या विकासाला चालना मिळेल.दळण वळणाच्या दृष्टीने हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा सोयीचा व गरजेचा असून रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाकडे पाठपुरवा करणार असल्याचे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा