Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

माळशिरस तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञान युक्त शिक्षणाचा पाया पानीव गावात निर्माण झाला----चंद्रशेखर गायकवाड .

 


विशेष -प्रतिनिधी--कासिम (राजु)मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी.

                          पानीव या गावात कर्तृत्वान आणि सामर्थ्यवान माणसे निर्माण झाल्यामुळे उत्तुंग आणि भव्य स्वप्न ठेवून त्या स्वप्नाला कृतीची जोड देऊन या गावातच आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाचा पाया निर्माण झाला.

श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा श्री प्रकाशबापू पाटील मार्गदर्शका मा सौ श्रीलेखाताई पाटील यांनी केलेले परीश्रमातून संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे त्याचे उदाहरण समोर पाहत आहेत 



माझ्या समोर पाच हजाराहून अधिक युवक - युवती ज्ञानार्जन घेत आहेत संस्थेचे सचीव मा श्री अभिजीत पाटील ,सचीव करण पाटील यांनी आपल्या प्रगल्भ विचारातून संस्थेला गतिमान उर्जा निर्माण करून आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाचा पाया अधिक मजबूत केला आहे .महासत्ताशाली राष्टासाठी आधुनिक ,तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाचा पाया भक्कम असणे अत्यंत महत्वाचे असून ते योगदान पानीव गावाने दिलेले आहे अशा गौरवास्पद शब्दातून व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांनी " राष्ट्र उभारणीसाठी युवक युवतींची जबाबदारी "या विषयावर बोलताना व्यक्त केले.२८ /१०/२०२३ रोजी सकाळी नऊ वाजता सदर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी श्रीराम शिक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी मा श्री वणवेसर अध्यक्षस्थानी होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक मा श्री प्राचार्य सुभाष घुलेसर यांनी केले तर सूत्रसंचलन आणि आभार गोरवेसर यांनी केले.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा