Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

क्रांतीसूर्य म.ज्योतिबा फुले स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स ४५ न्यूज मराठी

      महात्मा फुले हे केवळ बोलके सुधारक नव्हते, तर ते प्रत्यक्ष कृती करणारे महामानव होते. त्यांनी आपल्या देशात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला. शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्त्री शिकली तरच घराचा देशाचा विकास होईल म्हणून मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे तरच समाज सुधारेल आणी देशाची प्रगती होईल 

    मुलींच्या शिक्षणाची सुरुवात आपल्या पत्नीला शिक्षित करून केली. महात्मा फुले यांनी १८४८ साली पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची आणि १८५१ साली मुलांची शाळा सुरू केली. तत्पूर्वी ब्राह्मण मुलींना देखील शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. सर्व वर्णातील स्त्रियांचे स्थान अतिशूद्रात होते. महात्मा फुले यांनी शाळा सुरू करण्यापूर्वी मोफत आणि सर्वांसाठी शिक्षण नव्हते. त्यांनी स्त्रिया, अस्पृश्य, मजूर, शेतकरी या सर्वांसाठी शाळा सुरू केली. महात्मा फुले यांच्या जन्मापूर्वी सुमारे वीस वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज प्रतापसिंह महाराज वयाच्या गादीवर आले. तेंव्हा दुसरा बाजीराव हा पेशवा होता. त्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली. छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर तो आपल्या अंकित राहणार नाही, त्यामुळे त्यांना निर्बुद्ध ठेवण्यासाठी बाजीरावाने त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली होती. चोरून शिकवतील म्हणून त्याने गुप्तहेर नेमले. तेंव्हा प्रतापसिंह महाराजांच्या मातोश्री आनंदीबाई त्यांना मध्यरात्री शिकवायच्या. त्या करारी, बाणेदार आणि निर्भीड होत्या. आपला पुत्र अज्ञानी राहू नये म्हणून त्या छत्रपतींना चोरून शिकवायच्या. छत्रपतींची ही अवस्था तर अठरा पगड जाती बारा बलुतेदारांची काय अवस्था असेल? याची कल्पना करा. या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले आणि सावत्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केली ही आपल्या देशातील क्रांतिकारक घटना आहे. राधाकृष्णन यांनी जन्मल्यानंतर देखील सर्वांसाठी आणि मोफत शाळा सुरू केली नाही. राधाकृष्णन यांचा जन्म १८८८ सालातील आहे, महात्मा फुले यांनी १८४८ रोजी शाळा सुरू केल्या, म्हणजे


राधाकृष्णन यांच्या जन्मापूर्वी ४० वर्षे अगोदर फुले दांपत्याने मुलींसाठी शाळा सुरु केली होती तत्कालीन मनुवादी समजकडून फुले दाम्पत्यां चा खूप त्रास शन करावा लागला समाजाने त्यांना वाळीत टाकले घराबाहेर काढले ,प्रणघातक हल्ले ही झाले परंतु ते डगमगले नाहीत उलट खबीर पने तत्कालीन विचारप्रवाहाविरुद्ध असलेला आपला लढा निर्भीडपणे लढत राहिले .शिक्षणाप्रति समाजजागृती करीत असयुष्यभर चंदनापरी झिजत राहिले . इस्लामचा अभ्यास करताना ज्योतिबांना प्रेषित पैगम्बरांचे जीवन व क्रांतिकार्य आपल्या समाजिक क्रांतीच्या उद्दिष्ठांशी सुसंगत व प्रेरणादायी वाटले .स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व व व्यक्तिमह्त्व मान्य करणारा व तिला समाजात तसे स्थान देणारा हा जगातला पहिला महासपुरुष होता .प्रेधितांच्या विचार सरनीचा प्रभाव ज्योतिबांवर दिसतो

 एका पोवाड्यात ज्योतिबा म्हणतात


तेराव्या सदीचे पैगम्बरी खूण !

दविती प्रमाण कुराणात !

जगी स्ट्रीपुरुष सत्यधर्मी होती !

आनंदे वर्तीती जिती म्हणे !!


मुहम्मद झाला जहामर्द खरा !

त्यागिले संसारा सत्यासाठी !



 त्यांचा राष्ट्रवाद वैश्विक होता. त्यांचा राष्ट्रवाद वंश, धर्म किंवा भूगोल यावर आधारलेला नव्हता. विश्वातील सर्व मानवांचे कल्याण असा त्यांचा राष्ट्रवाद होता.

महात्मा फुले निर्भीड होते. ते कणखर होते. त्यांनी संकटावर मात करून यश मिळविले. ते पलायनवादी नव्हते, तर ते लढवय्ये होते. कठीण प्रसंगी ते निराश हताश होऊन बसले नाहीत. ते स्वाभिमानी होते, तसेच ते संवेदनशील मनाचे होते. ते जितके कर्तव्यकठोर होते, तितकेच ते विनयशील होते, परंतु विचाराबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. ते निस्वार्थी होते. ते प्रचंड कनवाळू होते. ते नीतिमान होते. 

महात्मा फुले यांनी आपल्या देशात सर्वांसाठी मोफत शिक्षण सुरू केले, त्यामुळे त्यांच्या नावानेच आपल्या देशातला "शिक्षक दिन" झाला पाहिजे त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे, हीच महात्मा फुलेंप्रती कृतज्ञता आहे.



नूरजहाँ फकृद्दीन शेख

गणेशगाव ता.माळशिरस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा