Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या इंदापूर तालुका उपाध्यक्ष" पदावर भागवत जाधव यांची निवड

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                            इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या इंदापूर तालुका उपाध्यक्ष" पदावर भागवत जाधव बावडा यांची निवड करण्यात आली.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी व सामाजिक व राजकिय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची नोंद घेऊन भागवत जाधव यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या "इंदापूर तालुका उपाध्यक्ष" पदावर निवड करण्यात आली आहे.

     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुरोगामी विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम सर्वाच्या सहकार्याने करावयाचे आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटना अधिकाधिक मजबुत करण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार असल्याचे भागवत जाधव यांनी सांगितले.

    इंदापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात खासदार सौ सुप्रिया सुळे यांच्या व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीणभैय्या माने, अशोकभाऊ घोगरे, महारूद्र पाटील, तेजसिंह पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी भागवत जाधव यांची निवड करण्यात आली.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा