विशेष प्रतिनिधी---राजु(कासिम)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
26 नोव्हेंबर हा दिवस सर्वत्र "संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने( संग्राम नगर) माळीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत" संविधान दिन" साजरा करण्यात आला त्याप्रसंगी प्रशालेचे शिक्षक- युनूस तांबोळी- यांनी संविधान दिनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की
देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतूदी एकत्रितपणे सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या आहेत त्यास" संविधान "असे म्हणतात देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतूदीचा लिखीत दस्तऐवज होय.
संविधानातील तरतूदीनुसार राज्य कारभार करण्याचे शासनावर बंधनकारक असते संविधानातील तरतूदी किंवा त्या त नमूद केलेला कायदा मूलभूत असतो . संविधानातील विसंगत ठरतील असे कायदे शासनला करता येत नाहीत असे कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते
भारतातील संविधान जगात श्रेष्ठ मानले जाते.
अशा प्रकारे शाळा संग्रामनगर (माळीनगर) येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक विनोद थोरात यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा