टाइम्स 45 न्युज मराठी.
" वाघाच्या " जबड्यात हात घालून "दात" मोजणारा एकच..त्याचे नावं हजरत टिपू सुलतान ! " तलवार "आणि भाला च्या जगात "मिसाईल आणि रॉकेट "चा शोध लावणारे आद्य क्रांतिकारी कोण ?? हजरत टिपू सुलतान ! स्त्रियांना स्वतःचे स्तन झाकण्याचा अधिकार देणारे कोण ??हजरत टिपू सुलतान ! माझ्या हिंदू बांधवांसाठी शेकडो मंदिरे बांधून खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव जपणारे कोण ??हजरत टिपू सुलतान !
वास्तव जीवनात अक्राळ विक्राळ वाघाशी झुंज देऊन त्याचा जबडा फाडणारा निडर योद्धा कोण ?? हजरत टिपू सुलतान !त्यांच्या स्वराज्यात तब्बल "256 मंदिरे " बांधून इतिहास निर्माण करणारे मुस्लिम राजे कोण ?? हजरत टिपू सुलतान !
आधुनिक पद्धतीने "रस्ते" बांधणारे ,रेशीम शेती निर्माण करणारे ,बांध बांधणारे ,त्या काळात पाण्याची कमतरता पडू नये म्हणून "धरण "बांधणारे कोण ??
हजरत टिपू सुलतान ! ज्यांच्या राजदरबारात 11 पैकी 7 सरदार हें "हिंदू - मराठा "होते , ज्यांचा पेहराव हिंदू राज्यकर्त्यांप्रमाणे होता ,असे महान राजे कोण ?? हजरत टिपू सुलतान ! श्रीमंत "जमीनदारांकडून " जमिनी त्या "गरीब" लोकांना दान करणारे, "माणुसकीची" शिकवण देणारे कोण ??हजरत टिपू सुलतान !
"ब्रिटिशांना " सळो की पळो करून ,झुंज देणाऱ्या टिपू सुलतान यांची जयंती सांगली -मिरजेत मोठ्या जल्लोषात साजरी झाली .
मिरजेत गेल्या 11 वर्षांपासून "टिपू सुलतान जयंती " साजरी करणारे धडाडीचे कार्यकर्ते "जैलाब शेख " यांच्या माध्यमातून "क्रांतीज्योती रॅली" मोठ्या उत्साहात काढण्यात आली . यावेळी सामाजिक कार्यकर्ते नारायण बेळगावकर , हयात फौंडेशन चे शकील पिरजादे , अल्लाबक्ष काझी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. टिपू सुलतान जयंतीचे औचित्य साधून 5000 हिंदू -मुस्लिम बांधवाना "महाप्रसाद "(जेवण ) देण्यात आले .यावेळी "पोलीस -प्रशासनाचा " चोख बंदोबस्त होता .
"शांतता व सुव्यवस्था" अबाधित ठेवत,युवा पिढीसाठी आश्वासक "बोद्धिक खाद्य" पुरवत , सांगलीत "समस्त मुस्लिम समाज,सांगली "च्या माध्यमातून नळभाग मध्ये "असिफ बावा मित्र परिवार " यांच्या तर्फे "रक्तदान शिबीर" संपन्न झाले .त्याशिवाय नवीन पिढीला टिपू सुलतान यांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने हजरत टिपू सुलतान यांचा "इतिहास " ,त्यांचे "कार्य": याचे "फ्लेक्स बोर्ड "लावण्यात आले होते तसेच "लेजरशो "च्या विहंगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
100 फुटी रोड वर सामाजिक कार्यकर्ते "टिपू इनामदार " यांच्या नेतृत्वाखाली टिपू सुलतान जयंती नेहमीप्रमाणे साजरी करण्यात आली . त्याशिवाय त्याच रोडवर अनके मंडळामार्फत टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली .
भारतात "जन्म" घेऊन ,याच मातीत 7दफन होणारा मुस्लिम आहे . ज्यांचा "D.N.A." भारतीय आहे, ब्रिटिश नाही . ज्यांच्या रक्तात भारताविषयी "प्रेम": आहे ,ज्याच्या "नसानसात" भारत मातेविषयी "अभिमान" आहे . या मातीशी "इमान" राखणारा ,याच भूमीवर (नमाज )च्या माध्यमातून ( सजदा ) करणारा , "नथमस्तक" होणारा मुस्लिम आहे .
टिपू सुलतान यांचे "रॉकेट " आणि मिसाईल लंडन मध्ये "म्यूजियम" मध्ये आजही सुरक्षित आहे . भारतातील सर्व "क्रांतिकारी "हें भारताचे भूषण आहेत .त्यांचे महत्व "अधोरेखित" आहे .त्यांचा "सन्मान" व्हायलाच हवा ."छत्रपती शिवाजी महाराज" , राणी लक्ष्मीबाई ,तात्या टोपे, टिपू सुलतान हें खरे क्रांतिकारी होते .त्यांचा इतिहास अजरामर आहे व राहणार !
डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा गांधी , शाहू महाराज , सावित्रीबाई फुले , यांच्या "विचारांना" रोखण्याचा निष्फळ प्रयत्न आज होताना दिसत आहे .परंतु महाराष्ट्रातील "बहुजन -मराठा - मुस्लिम" हा एकच आहे ,तो "सर्वधर्मसमभाव" मानणारा आहे .
सांगलीत "नळभागात" झालेल्या भव्य कार्यक्रमात सलमान बावा, हंजल बावा, अरसलान बारसकर, आशपाक जमादार, हुजेफ फकिर, मुनीर मुल्ला, करीम मुजावर, अकरम शेख फारूक शेख, त्यात सरफराज शैख, वसीम मगदूम, सुहेल मुल्ला , नईम पटवेगार, नवाज शेख यांनी "नेटके" संयोजन केले.
"इकबाल बाबासाहेब मुल्ला" ( पत्रकार )
संपादक - सांगली वेध ,
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली .
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा