अकलूज प्रतिनिधी
शकुर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंत नगर येथे *माझी देखणी पणती व "माझं सुंदर आकाश कंदील" ही कार्यशाळा संपन्न झाली.
विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळावा त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टिकोनातून आर्थिक सक्षमता प्राप्त करून पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी करता यावी या उद्देशाने प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. वेगवेगळ्या पणतींवर रंगकाम करत विद्यार्थ्यांनी आपली कलाकौशल्ये दाखवली. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी कागद वापरून विविध कला कौशल्यांसह सर्व विद्यार्थ्यांनी आकाश कंदील तयार केले. प्रशालेतील कलाशिक्षक धन्यकुमार साळवे यांनी वेगवेगळ्या रंगीबेरंगी कागदापासून आकाश कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले.
कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव यांनी कलात्मकरित्या प्रोत्साहन दिले.
वेगवेगळे रंगीबेरंगी कागद, डिंक कात्री, वॉटर कलर व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील स्वनिर्मितीचा आनंद यामुळे वातावरण अगदी कलात्मक होऊन गेले.
ही कार्यशाळा संपन्न करण्यासाठी किरण सूर्यवंशी, बाळासाहेब झांबरे, हसीरूण मुलाणी, भाग्यश्री उरवणे ,प्रतिभा राजगुरू यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा