विशेष -प्रतिनिधी--कासिम (राजु)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
आज दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावबहाद्दूर गट (बिजवडी )येथे दीपावली सणाचे निमित्त साधून आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव जीवनातले सर्व अंधकार दूर करून आपले जीवन प्रकाशमय करण्यासाठी एक ऊर्जा देणारा हा उत्सव. या सणादिवशी सगळीकडे दिव्यांची आरास केली जाते, दरवाजावर आकाश कंदील लावला जातो. विद्यार्थ्यांना कार्यानुभव अंतर्गत प्रसंगोपात सोपे उपक्रम मधील आकाश कंदील बनविण्याचे प्रात्यक्षिक श्री.अजमीर फकीर सर यांनी करून दाखवले. मग विद्यार्थ्यांनी कार्डशिट पेपर, घोटीव कागद, रंगीबेरंगी चिकट टेप इत्यादी साहित्य वापरून आकर्षक असे आकाश कंदील बनविले. यामध्ये अंगणवाडी सेविकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणातून आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. फटाके फोडल्याने होणारे पर्यावरणाचे नुकसान, फटाक्यातून बाहेर पडणारे विषारी वायू, त्यामुळे श्वसनाचे होणारे वेगवेगळे रोग याविषयी श्री.श्रीकांत राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फटाक्याला फाटा देऊन आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
शेवटी विद्यार्थ्यांना रुचकर असा इडली- सांबर चा पोषण आहार देण्यात आला. सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री.श्रीकांत राऊत सर, अजमीर फकीर सर, अंगणवाडी सेविका सारिका चव्हाण, गिरीजा गेजगे यांनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा