ज्येष्ठ -पञकार--संजय लोहकरे.
टाइम्स 45 न्युज मराठी.
माळशिरस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती,नगरपंचायत व नगरपरिषदेमध्ये दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा.अशी प्रहार संघटनेची मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व माळशिरसचे तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे
दिव्यांची प्रहार संघटना (आ.बच्चू कडू पाटील प्रणित) सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शहाजीराव माने-देशमुख,गोरख जानकर यांनी दिव्यांग दिन ३ डिसेंबर रोजी येत आहे.तरी शासकीय व निमशासकीय कार्यालयात व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतील कार्यालयात नगरपंचायत व नगरपरिषदेमध्ये दिव्यांग दिन साजरा करावा अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. यामुळे दिव्यांगा बद्दलच्या कायद्याची जनजागृती होईल व समाजात दिव्यांगाना सन्मानाची वागणूक मिळेल.याचा विचार करून तत्काळ तालुक्यातील सर्व अधिका-यांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे.अन्यथा ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग दिन साजरा होणार नाही तेथे प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे हि निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी दिव्यांग संघटनेचे संजय पवळ,मनोहर गायकवाड, सौ.संजीवनी भोळे,जावीर मॅडम सर्व अपंग दिव्यांग महिला भगिनी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा